Header Ads Widget

*शिंदखेडा येथे दिनांक 25 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*


शिंदखेडा प्रतिनिधी - येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालय विरदेल रोड येथे दिनांक 25 जुलै शुक्रवार रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कारगिल विजय दिवस निमित्त सैनिकांच्या सन्मानार्थ सकाळी 9 ते 12 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.या शिबिरासाठी डॉ.अक्षय कैलास मराठे M.D.Medicine (ISM) कन्सल्टिंग फिजिशियन, डॉ.सायली अक्षय मराठे BAMS DGO CSVD (ISM) स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ सुविधा हॉस्पिटल शिंदखेडा तसेच डॉ.जगदीश बोरसे MD peds बालरोगतज्ञ शिवांश हॉस्पिटल शिंदखेडा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.सदर शिबीराचे आयोजन खान्देश रक्षक सेवा मंडळ शिंदखेडा यांच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांनी केले आहे.जास्तीत जास्त संख्येने लहान मुले,महिला व पुरूषांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भुषण पवार व खानदेश रक्षक ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments