Header Ads Widget

*दोंडाईचा येथे विशेष शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या सि आर ई प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप*


दोंडाईचा, २४ जुलै २०२५ : स्व. खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय, दोंडाईचा (जि. धुळे) येथे २२ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय सि आर ई (Continuing Rehabilitation Education) विशेष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आज उत्साही वातावरणात पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले सुमारे २०० विशेष शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

सुंदरदेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव साळुंके पाटील साहेब होते. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरसीआय कोऑर्डिनेटर श्री. सुरेश राठोड (मुंबई), महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राज्य संपर्कप्रमुख सौ. पूजा खडसे, संस्थेचे संचालक मा. शुभमदादा साळुंके, मुख्याध्यापिका मंदा इंगळे, विशेष शिक्षिका मनिषा घुगे, आणि सिआरई समन्वयक कमलेश निकम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. पूजा खडसे मॅडम यांनी एनजीओ क्षेत्राला मिळणाऱ्या शासकीय योजनांबाबत माहिती दिली. शुभमदादा साळुंके यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या, तर अध्यक्षीय भाषणात मा. शिवाजीराव साळुंके पाटील यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानून विशेष शिक्षण क्षेत्रातील या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सिआरई प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शिक्षकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विशेष शिक्षण व पुनर्वसन विषयक सखोल मार्गदर्शन मिळाले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणातून शिक्षकांना त्यांच्या व्यावसायिक कामगिरीत उपयुक्त ठरेल अशी माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले.

समारोपप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकॉलॉजिस्ट किशोर शेलार व रमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका मनिषा घुगे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विशेष शिक्षकांना सक्षम बनविणाऱ्या या सिआरई प्रशिक्षणाने एक सकारात्मक ऊर्जा दिली असून, भविष्यातही असे कार्यक्रम सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी दोंडाईचा पत्रकार दोंडाईचा*.

Post a Comment

0 Comments