Header Ads Widget

*दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा*


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वी संजीवन समाधी सोहळा  सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर  संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची व प्रतिमेची पुजन व आरती सहसचिव 
श्री राजेंद्र कोंटुरवार व सौ शितलताई कोंटुरवार यांच्या हस्ते करण्यात येऊन संतोषी माता मंदीर गणपती मंदीर आझाद चौक पंचवटी भागातुन निघुन शेवटी मंगलकार्यालयाच्या जागेवर दुपारी १२ वाजेला संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालकीची अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी व सौ सुनिता शिंपी सचिव श्री चंद्रकांत कापुरे व सौ. सविताताई कापुरे यांच्या हस्ते आरती करून विर्सजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकर जाधव यांच्या शुभ हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पुजा करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली यावेळी समाजाला मार्गदर्शन करताना समाज अध्यक्ष श्री  पांडुरंग शिंपी, प्रा.प्रकाश भांडारकर श्री सुरेश बागुल,श्री हरिदास जगताप, श्री चद्रकांत कापुरे यानी समाजाचे होत असलेल्या नियोजित मंगलकार्यालयाच्या बांधकाम पुर्ण करण्यास आवाहन केले यावेळी ज्या समाज बांधवानी आज देणगी दिली त्या समाज बांधवांच्या सत्कार करण्यात आला यावेळी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंंपी यांनी आपल्या तीन वर्षाच्या कार्याचा अहवाल सादर करून समाज बांधवांनी आजवर केलेल्या सहकार्याबद्धल आभार व्यक्त केले*
*तसेच कल्याण येथील  दानशुर व्यक्तिमत्व असलेले आपले समाज बांधव श्री मनीलाल शिंपी (ए.एस.पी.कमांन्डर) यांनी लकी ड्राँ करिता ९ पैठणी साड्या पाठवले होत्या तसेच विद्यार्थी यांनी २५ दप्तर पाठवलेली होती ती शालेय दप्तर व समाज संस्थे तर्फे सर्टीफिकेट देण्यात आले.  तसेच १०६  समाज बांधवांनी लकी ड्रा योजनेत भाग घेऊन कुपन बाॅक्स जमा केले होते  आलेले समाज बांधवाचे लहान मुलांच्या हस्ते नऊ लकी भाग्यवान विजेत्या समाज भगिनींचे कुपन काढण्यात आले व बक्षीस पात्र महिलांना येवला पैठणी साड्या दोंडाईचा शिंपी समाज महिला मंडळाचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते देण्यात आले*
 *तसेच मा. युवाध्यक्ष श्री सतिश जाधव यांच्या  वाढदिवस आज असल्याने त्यांचा वाढदिवसा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सौ शितलताई कोंटुरवार श्री पुरूषोत्तम सोनवणे श्री पंढरीनाथ चित्ते यांनी अत्यंत सदाबहार असे संताचे गित गाऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष श्री शरद पवार, सचिव श्री चंद्रकांत कापुरे, सहसचिव प्रा.राजेंद्र कोटुंरवार धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल धुळे जिल्हा युवाध्यक्ष श्री. विशाल कापडे, श्री हरीदास जगताप, श्री राजेंद्र गवळे श्री मनोज मेटकर, श्री मधुकर जाधव, श्री तुकाराम जगताप, श्री तुळशीराम जगताप,श्री सुकलाल जगताप, श्री गोवर्धन पवार, श्री अरूण पवार, डाॅ.प्रा कैलास कांपडणे, मा. युवाध्यक्ष श्री. सतिश जाधव श्री देवेंद्र गवळे श्री योगेश बोरसे, श्री महेन्द्र जगताप श्री सचिन जगताप,  श्री दिपक पवार श्री नरेंद्र जगताप, श्री निलेश चित्ते तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार, सौ पुनमताई सांळुखे, सौ वर्षा खैरनार, सौ रत्ना चित्ते, सौ सुनिता शिंपी, सौ सुरेखा जाधव, सौ हेमलता पवार, यांनी व सर्व समाज बांधवानी विशेष परिश्रम घेतले तसेच उत्कृष्ट सुत्रसंचालन सहसचिव प्रा. राजेंद्र कोंटुरवार तसेच शेवटी आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री शरद पवार यांनी केले ✍️✍️
श्री पांडुरंग शिंपी  पत्रकार दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments