तलवारबाजी जिल्हा स्पर्धेचे उदघाटन करतांना कु.जोगेश्वारी मिस्तरी क्रीडा मार्गदर्शक, अभय कुलकर्णी महसूल अधिकारी, जिल्हा सचिव कैलास कंखरे, प्रियंका पाटील, प्रणव पाटील, विशालराव तलवारबाजी प्रशिक्षक (कोलकाता) आदी मान्य
धुळे येथे सन 2025-26 ची 14 वर्षा आतील सब ज्युनियर जिल्हा तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुलींचे आयोजन धुळे तालुका तलवारबाजी असोसिएशन व तलवारबाजी संघटना धुळे जिल्हा कै.सौ.चंद्रभागाबाई भिका कंखरे बहुददेशिय संस्था यांच्या संयुक्त विदयमाने धुळे येथे जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे दिनांक 02/08/2025 रोजी उदघाटन करण्यात आले.
जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत धुळे,साक्री,शिरपूर, शिंदखेडा, सोनगीर येथील खेळाडूंची उपस्थिती लाभली होती.
स्पर्धेचे अध्यक्ष कु. जोगेश्वरी मिस्तरी क्रीडा मार्गदर्शक यांच्याहस्त्े करण्यात आले तसेच उदघाटक श्री.अभय कुलकर्णी महसूल अधिकारी जिल्हा सचिव कैलास कंखरे प्रमुख मान्यवर प्रणव पाटीलसर, प्रियंका पाटील, ठाकरे सर,प्रशांत शिंदे सर,जयेश पाटील (पत्रकार) बसंती पाडवी संचालीका महसूल पतपेढी धुळे,उज्वला पाटील ‘शामल पाटील क्रीडा शिक्षक प्रशिक्षक विशालराव (कोलकता) यांच्या उपस्थितीत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले व उदघाटन झाले.
खेळाडूना मार्गदर्शक करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश्वरी मिस्तरी यांनी खेळाडूंना तलवारबाजी हा खेळ पारंपारिक असून त्यांतून जिदद व चिकाटी सोबत मर्दानी खेळ असल्याने आपण जास्तीत जास्त सराव करून राष्ट्रीय व राज्य पातळीवर धुळे जिल्हाचे नाव उंचवावे अश्या शुभेच्छा दिल्यात.
पंच म्हणून राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू रोहित धनगर, अनिल वाडीले, आश्विन पाटील, मयूर माळी, कृष्णा धाकड यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा सचिव कैलास कंखरे व आभार विशालराव यांनी मानले.
निवड झालेले खेळाडू हे 8 ते 10 ऑगस्ट 2025 हिंगोली येथे होणा-या सब ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धसाठी धुळे जिल्हा संघाकडून प्रतिनिधीत्व करणार आहे.
0 Comments