*जनमत-*
*दोंडाईचा-* गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट व बिनधास्त-राजेरोसपणे कायद्या व सुव्यवस्थेचे चार चौदा वाजवत दिवसाढवळ्या दुकानदारांना मारहाणीचा घटना होत असताना मात्र जिल्हा कर्तव्य प्रमुख यांनी फक्त खांदा पालट करत येथील शहर कर्तव्य प्रमुख यांच्या बदलीच्या जागी नवीन शहर कर्तव्य प्रमुख यांची नेमणुक केली आहे. पण नुसते खांदा पलट होऊन दोंडाईचा शहराचा प्रश्न सुटणार नसुन ह्या सर्व घटना-क्राईम वाढवायला जे मुख्य कारण आहे ते म्हणजे गावात सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले तरच कायदा व सुव्यवस्थेचे राज्य दोंडाईच्यात खऱ्या अर्थाने निर्माण होईल.म्हणून खांदा पालट परिस्थितीवर नवा भिडू जुना राज अशीच परिस्थिती राहता-दिसता कामा नये,अशी अपेक्षा ह्या शहरातील सुजाण नागरीक जिल्हा कर्तव्य प्रमुख व नव्यानेच मुंबईहून आलेले शहर कर्तव्य प्रमुख यांच्याकडे व्यक्त करत आहे.
दोंडाईचा शहर पाहिले तर तसे खुप शांत आणि संयमी गाव आहे.कारण ह्या गावात चांगले व्यापारी व व्यवसायीक वर्गासोबत विविध शैक्षणिक पात्रतेतून स्व:ताला उच्च पदापर्यंत पोहवणारे अनेक गुणी तरूण विद्यार्थी देखील आहेत.म्हणजे मागे दोन कष्टकरी सामान्य परिवारातील मुले परिस्थितीशी दोन हात करत अपार मेहनत घेत न्यायाधीश होण्यापर्यंत मजल गाठली तर दुसरीकडे एक राज्य परिवहन महामंडळात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्याचा मुलाने वेगवेगळ्या राज्य परिक्षा माध्यमातून मुबंईचा सीपी होण्यापर्यंत मजल गाठली आहे.थोडक्यात अशी अनेकांची उदाहरणे आपल्याला लोकांसमोर देता येतील.म्हणजे ही सर्व परिस्थिती मांडायचे कारण एवढेच आहे की, गाव सुंदर संयमी व शांत तसेच कायदाप्रीय नागरीकांचे आहे.पण बोटांवर मोजता येईल एवढ्या लोकांमुळे-अवैध धंदे करणाऱ्यांपुढे गावाची परिस्थिती गढूळ-तरूणांना वाईट मार्गाला ओढायला-कायदा व सुव्यवस्थेचे चार चौदा वाजवायला भाग पाडत आहे.म्हणजे एखाद्या परिवारात बाप काका शिक्षक,परिस्थितीने वेल आणि गुड त्या परिवारात पुन्हा एक मुलगा शिक्षक एक व्यापारी आणि ते वर्गात-शिक्षण क्षेत्रात चांगली पिढी घडवायचे धडे-काम त्यांच्या हाती दिले असेल आणि दुसरीकडे वर्गाबाहेर आल्यावर तेच तरूणांना विमल गुटखा विकून कॅन्सर ग्रस्त आजार देवून पुर्ण कुटुंब उद्ध्वस्त करत असेल तर अशा अवैध धंदे करणाऱ्यांपुढे समाज प्रगती होईल की अधोगतीला जाईल हे आपण जनता-शासनानेच ठरवावे.
आज शासनाच्या लोकप्रतिनिधींना हे सर्व दिसते-कळते.पण तेच ह्या अवैध धंदेवाल्यांसोबत मोठमोठ्या बॅनर व कार्यक्रमात सेल्फी काढत-दाखवत प्रसिद्धीस देत असतात.म्हणून जनताही समजून जाते,सट्टा-मटका-जुगार-दारु,विमल गुटखा आदी अवैध धंदे करणारे यांचे गळ्यातील तावीत असुन, त्यांच्या अशा वागण्याने जनता सुखी कुठून राहील आणि ह्या अवैध धंदेवाल्यांची तक्रार केल्यावर यांचे कोण केस कापून घेणार आहे.मागील अंकात जनमत ने एकवेळा नव्हे दोनवेळा गावात सुरू असलेले अवैध धंदे व दुकानदारांना होणाऱ्या मारामारीच्या घटनांना उजाळा दिला.तरी झाले काय तर, नाही अवैध धंदे बंद झाले व नाहीतर मारामाऱ्या बंद झाल्या.म्हणजे गावात आजही अवैध धंदे करणारे तेजीत-वटमध्ये छाती मोठी करून फिरत आहे तर मारामाऱ्या करणाऱ्यांनी जागा-चौक-घटना ताजी-सारखीच ठेवत फक्त मार खाणारा एक भाजपा मोठा नेत्याचा पीएचा मुलगा, साला व मित्र यांना टारगेट केले होते.त्यात ज्या पद्धतीने मारहाण झाली ती प्रत्यक्षदर्शी घटना मन-अंगाला शहारे आणणारी होती.म्हणजे फक्त किरकोळ कट लागल्यावरून न मोटरसायकलीचे जास्त नुकसान झाले न कोणाला गंभीर इजा झाली.तरी सोळा-सतरा वर्षाच्या कोवळ्या मुलाला त्याच्या मामाला व मित्राला असे झोडपले की अक्षरक्ष: पाहणाऱ्यांनी हायतौबा केली.कारण पाहणेही पाप होते आणि त्यात वाचवायला जाणे तेही महापाप होते.त्याचे मुळ कारण म्हणजे दोघेही एकाच गट-पक्षाचे होते.म्हणून घटनेला चार दिवस उलटले तरी कागदोपत्री कुठेही नोंद नव्हती.मग गावात चर्चा झाली की नेत्यानेच सर्वकाही मिटवले.आता विचार करा हीच परिस्थिती सर्वसामान्यांवर आली असती तर किती दैना परिस्थिती त्या परिवाराची झाली असती.पण जर गावात सुरू असलेल्या अवैध धंदे मुळे ऐवढी हिंसक-मुजोरी येत जर भाजपा पीएचा मुलगाच सुरक्षित नसेल आणि कायदा व सुव्यवस्थेचे चार चौदा वाजवत असतील तर जिल्हा कर्तव्य प्रमुख यांनी नुसते खांदा पलटून चालणार नसून त्या खांद्याला अवैध धंदे बंद करायचे मजबूत बळ-पावरही दिले पाहिजे तरच खाकी ड्रेसवरची पांढरी रेष मिटेल व जनतेचा विश्वास खात्यावर कायम राहील, असे जनतेच्या मनात वरील सुरू असलेले अवैध धंदे व मारहाणीच्या घटनेवरून खदखद व्यक्त होत आहे.
0 Comments