शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी : येथील बुराई नदीवरील जुण्या पुलावरून मंगळवारी (ता.30) सायंकाळी पाचला एक अनोळखी इसम पुलावरून जात असताना, पुलाखाली कोसळला. याबाबत वाहनधारकांनी पोलिसांना माहिती दिली. रूपेश चौधरी यांनी त्या इसमाला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनाने आणले. तेथे डॉ. भूषण काटे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या इसमाचे वय ३५ ते ४० वर्षे असून, जिन्सची पॅन्ट व चॉकलेटी रेघा असलेल्या शर्ट परिधान केला आहे. पायाला जखम झाल्यायाचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्या इसमाची ओळख पटली नव्हती. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. वैभव देशमुख तपास करीत आहेत. दरम्यान, बुराई नदी जुण्या पुलावरील लोखंडी कठडे तुटल्याने ते धोकादायक ठरत आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
0 Comments