Header Ads Widget

शेवंती प्रायमरी स्कूल व कृष्णा हायस्कूल मोराणे उपनगर या शाळांत पालक-शिक्षक सभा आयोजित

धुळे - शेवंती कृष्ण ट्रस्ट' संचलित शेवंती प्रायमरी स्कूल व कृष्णा हायस्कूल मोराणे उपनगर  या शाळांत  दिनांक - 26 जुलै 2025 रोजी पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेस शिक्षण विस्तार अधिकारी सौ. देवयानी वाघ मॅडम उपस्थित होत्या. अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त श्री पुष्पराज शिंदे यांनी भूषवले. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. के. ठाकरे, खजिनदार सौ. पुष्पल  ठाकरे, संस्थेचे विश्वस्त डॉ.एम. एम. पवार सर, कर्नल उत्तमरावजी पाटील  हेही आमंत्रणावरून उपस्थित होते. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. के.ठाकरे ठाकरे यांनी पाहुण्यांची ओळख व परिचय करून दिला.परंपरेनुसार सर्वांचे स्वागत केले.सभेत पालक-शिक्षक सभा कशी असावी, पालक- शिक्षक कार्यकारणी सभेची संरचना याबद्दल देवयानी वाघ मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कर्नल उत्तमराव पाटील यांनी कारगिल दिनानिमित्त वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांबद्दल तसेच त्या युद्धाबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना देशाची सेवा करण्याचे आवाहन केले. सभेत पालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा  झाली. सभेचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी  कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.कविता शितोळे यांनी केले.


Post a Comment

0 Comments