Header Ads Widget

*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *संघटनेने मा.उपायुक्त (अंगणवाडी) यांना दिले निवेदन...*

         राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांना FRS आणि EKYC करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, मा. सुप्रीमकोर्ट च्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी लागू करा, भुसावळ ग्रामीण आणि नागरी प्रकल्पतील अंगणवाडी सेविकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(BLO) म्हणून दिलेल्या नियुक्ती रद्द करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार योजना बाह्य कामे देऊ नये,सेवा निवृत्ती नंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4.00 वाजे ऐवजी सकाळी 7.30 ते दुपारी 2.00 अशी करावी,प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कामाची सक्ती करण्यात येऊ नये.
        यांसह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन श्री.विजय क्षीरसागर साहेब मा.उपायुक्त (अंगणवाडी),एबाविसे,योजना, रायगड भवन,नवी मुंबई यांना आज रामकृष्ण बी. पाटील आणि युवराज बैसाणे, अमोल बैसाणे यांनी देऊन सविस्तर चर्चा केली.
         शासन स्तरावरील मागण्याबाबत शासनाकडे शिफारस करून पाठविल्या जातील तसेच भुसावळ ग्रामीण व नागरी प्रकल्पात दिलेल्या BLO च्या नियुक्ती रद्द करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगांव यांना तातडीने पत्र पाठविले जाईल. असे चर्चेअंती सांगितले.

Post a Comment

0 Comments