बेटावद प्रतिनिधी.
विवाह इच्छुक जैन समाजातील युवक युवतींनी भारतीय जैन संघटनेने एकदम नव्याने विकसित केलेल्या परिणय पथ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.ते अक्कलकुवा येथे आराधना भावनात संवाद दौऱ्याअंतर्गत आयोजित सभेत बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी चातुर्मास समितीचे अध्यक्ष मांगीलाल
संकलेचा होते.व्यासपीठावर खान्देश अध्यक्ष प्रा.डागा,खान्देश विभाग सदस्य
मनोज कोचर,जिल्हा उपाध्यक्ष कुशल कोचर,सुरेश गुलेच्छा आदि उपस्थित होते.प्रास्तविक शुभम भन्साळी यांनी केले.
प्रा.डागा म्हणाले,आजची यूवा पीढी विवाहाला घेऊन एक नवी दृष्टी व वेगळा विचार करत आहे.त्यांची प्राथमिकता, अपेक्षा, वैवाहिक जीवनात संबंधी त्यांचा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा खूपच वेगळा आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय संघटनेने युवांसाठी जीवनसाथी निवडण्यासाठी परिणय पथ हे व्यासपिठ उपलब्ध करुन दीले आहे.
दोन भिन्न आयु वर्गासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.ता.16 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर मध्ये 26 ते 30 वयोगटातील मुली व 28 ते 32 वयातील मुले तर 17 ऑगस्टला अहिल्यानगर येथे 22 ते 26 वयाच्या मुली तर 24 ते 28 वयाच्या मुलांसाठी. जास्तीत जास्त व इच्छुक युवक युवतींनी भाग घेण्यांचे आवाहन केले.
सन 2024 व 25 मध्ये दहावी व बारावीच्गुया35 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रामाण पत्र व भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संवाद यात्रेला समाजाचे मोठया संख्येने बंधु -भगिनी उपस्थित होत
0 Comments