बेटावद प्रतिनिधी.
भारतीय जैन संघटना शाखा खापर तर्फे शहारातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा येथील जैन मंदिराच्या हॉलमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे पूर्व अध्यक्ष मोहनलाल बोथरा होते.भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर भारतीय संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष ऍड.अल्पेश जैन जिल्हा उपाध्यक्ष कुशल कोचर , श्री संघ अध्यक्ष सूरेश बोथरा, संतोक गुलेच्छा,धर्मचंद चोरडिया, हिरालालचौधरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खापर शहराध्यक्ष पवन बोथरा यांनी केले.
रियाप्रसंगी याप्रसंगी सन 2024व 2025 या वर्षात दहावी व बारावी तसेच ग्रज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी धारकांना प्रमाणपत्र मोमेंटो व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जवळपास विद्यार्थी,पालक व समाज बांधव २०० जणांची उपस्थिती होती.
**नवीन कार्यक्रम परिणय पथ
याप्रसंगी प्रा.डागा यांनी भारतीय जैन संघटनेचे सुरू असलेले फाउंडेशन कार्यक्रम,स्मार्ट गर्ल,मूल्यवर्धन शिक्षण, अल्पसंख्यांक व एम एस एम इ कार्यशाळा आदी बाबत माहिती दिली. तसेच आजची युवा पिढी विवाह घेऊन एक नवी दृष्टी व वेगळा विचार करत आहे. त्यांची प्राथमिकता,अपेक्षा, वैवाहिक जीवनासंबंधी त्यांच्या दृष्टिकोन पहिल्यापेक्षा खूपच वेगळा आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेने जीवनसाथी निवडण्याठी परिणय पथ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.16ऑगस्टला छत्रपती संभाजी नगर येथे सव्वीस ते तीस वयोगटातील मुली तर 28 ते 32 वयाची मुले व17ऑगस्टला अहिल्यापुर येथे 22 ते 26 वयाच्या मुली तर 24 ते 28 वयाच्या मुलांसाठी कार्यशाळेच
आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा.डागा यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित जाट यांनी केले.
कार्यक्रमाचे अंतर्गत खापर शहर कार्यकारी सदस्यांना भारतीय जैन संघटनेची शपथ सदस्य कमलेश चोरडिया, अमित सिसोदिया, महावीर बोथरा,हिमांशू बोथरा,कुशल झाबक, पिंकेश जैन ,वर्धमान ललवाणी, अनिल बोथरा,नरेश बोथरा, प्रफुल चोपडा यांना ऍडव्होकेट अल्पेश जैन यांनी दिली
0 Comments