Header Ads Widget

बेटावद येथे मिरवणुकीने कानुमातेस दिला निरोप


बेटावद प्रतिनिधी.
    बेटावद येथे खान्देशाची ग्रामदैवत मानली जाणारी कानबाई मातेची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली रविवारी सायंकाळी विधिवत पूजा, आरती आणि रोटांचा नैवेद्य दाखवून हा पारंपरिक सोहळा संपन्न झाला सोमवारी सकाळी १० वाजता कानबाई मातेचे वाजत
 गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला या सणासाठी नोकरी व्यवसाय निमित्त बाहेर गावी गेलेले कुटुंबातील सदस्य एकत्र आले होते त्यांनी रविवारी दुपारी विधीवत कानबाई मातेचे पूजा केली त्यानंतर रोटाच्या नैवेद्य दाखवून प्रसादाच्या आस्वाद घेण्यात आला रविवारी रात्रभर जागरण करण्यावर भर देण्यात आला होता रात्रभर कानबाई माते समोर नृत्य, गायन करून जागरण करण्यात आली सोमवारी सकाळी १० वाजता विसर्जनास वाजत गाजत मिरवणुकीने सुरूवात झाली बारा वाजेच्या सुमारास मिरवणूक पांझरा नदीकाठी आल्या या ठिकाणी कानुबाई मातेची आरती करून विसर्जन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments