शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी:-
शिंदखेडा शहरात शबरी आवास योजनेत ५५ लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले असून शहरी भागात मंजूर झालेले ही योजना जिल्ह्यातील पहिली ठरली. या लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या खंबीर नेतृत्वात व गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाने आणि गुलाब सोनवणे यांच्या प्रयत्नाने आदिवासी बांधवांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. या ५५ लाभधारकांना दोन लाख पन्नास हजार रुपये घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहेत. त्यातील पहिला हप्त्याची रक्कम नगरपंचायतीकडे आलेली आहे. लवकरच या ५५ घराकुलांचे काम पूर्णत्वास येईल.शबरी आवास योजना ही अनुसूचित जमातीच्या (ट्रायबल) लोकांसाठी घरकुल (निवाऱ्याची) योजना आहे. शिंदखेडा शहरातील लाभार्थी आदिवासी बांधवांनी दोंडाईचा येथे जाऊन जयकुमार रावलांचे आभार मानून सत्कार केला.प्रसंगी रावसाहेब अनिल वानखेडे भाजपा गट नेते न. पं. शिंदखेडा, जिल्हा चिटणीस प्रविण माळी, माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांची उपस्थिती होती.
या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मधील बेघर किंवा ज्यांचे स्वतःचे घर नाही, अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे केंद्र सरकार ६०% आणि राज्य सरकार ६०% अनुदान देते.
खालील लोकांना लाभ मिळाला -
अशोक पवार, वसंत मालचे, राजू पवार,भीमराव सोनवणे, संग्राम पवार, देविदास महाले, कैलास सोनवणे, किसन महाले, नथू मोरे, श्रीमती संगीता पाडवी, श्रीमती सरस्वती महाले, कैलास मालचे,रमेश सोनवणे यांसारखे ५५ लाभार्थी आदी
0 Comments