Header Ads Widget

*शिंदखेडा येथे आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप* *बबनभाऊ सकट मित्र परिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन*

      शिंदखेडा( यादवराव सावंत )प्रतिनिधी:- येथील  वरपाडे रोड जवळील मांग गारोडी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त करण्यात आले.  येथील बबनभाऊ सकट मित्र परिवार यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले, जिल्हा चिटणीस प्रविण माळी , प्रकाश चौधरी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले, भाजपा शहराध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक चेतन परमार ,किसन सकट,रमेश भामरे,भाजपा शहर उपाध्यक्ष बबन गोविंद सकट, गुलाब सोनवणे, भुपेंद्र देवरे ,पोलीस गोपणीय विभाग अनंत पवार आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शिंदखेडा नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनानुसार व सहकार्याने सदर मातंग समाजातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सुमारे शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ह्यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन बबनभाऊ सकट मित्र परिवार यांनी केले होते. त्यासाठी बबन गोविंद सकट, किसन सकट, मधुकर लोंढे, कचरु कसबे, जगन सकट, संजय सकट, शिवा पाथरे,भगवान कसबे, अर्जुन ऊमप,आधार सकट, शिवा कसबे, नाना रोकडे, भास्कर कसबे, नितीन सकट,मनोज ऊमप,शिवदास सकट,रविंद्र कसबे, दिनेश कसबे, रविंद्र पाथरे,ज्ञानेश्वर सकट, करण उमप,संजय उमप,हिरामण कसबे, अर्जुन कसबे, पुना पाथरे, संजय कसबे आदि समाजातील प्रतिनिधी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments