्शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- 1ऑगस्ट 2025 रोजी उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री.डी एस पाटील सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री.अनिल पाटील होते. विद्यामंदिरातील शिक्षक श्री.एच के देसले व श्रीमती एम.एच.काटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वकृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या आजच्या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री.आर आर पाटील व संस्थेचे सचिव इंजि.श्री उज्वल पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजन बद्दल व विद्यार्थ्यांच्या वकृत्वाबद्दल समाधान व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले.जयंती व पुण्यतिथी यांच्यातून विद्यार्थ्यांनी बोध घेतला पाहिजे आणि थोर व्यक्तींचे चांगले आचार विचार अंगीकारले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. मनोज सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती वाय.पी. साळुंखे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदांनी परिश्रम घेतले.
0 Comments