*ग्राहकांना एक रूपया सुट द्यायचा नाही व दुसरीकडे सरकारला वस्तू विक्री- टॅक्सरूपात एक रूपया द्यायचा-दाखवायचा नाही,अशा दुकानदांराची लागली वाट....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* शहरात आज दुपारपासुन काही बड्या दुकानदारांवर पोळ्याच्या बैलासारखी राबायची परिस्थिती निर्माण झाली असुन,काहींनी जी.एस.टी.अधिकारी गावात आल्याचे ऐकून शटर बंद करून मंगल केले तर काही महाभाग दुकानदार टारगेट नुसार सापडल्याने रात्री उशीरापर्यंत जी.एस.टी.अधिकारी त्यांना हा कागद आण,तो कागद-बील दाखव,असे म्हणत पोळ्याच्या बैलासारखी परिस्थिती करून दुकानांना सील ठोकून गेले आहेत, त्यामुळे गावात चांगलीच खमंग चर्चा झाली असुन जे ग्राहकांना एक रूपया सुट देत नाही व सरकारचा करही बुडवतात,अशांसोबत सील बंदचा जो कार्यक्रम झाला,तो चांगला झाला अशी प्रतिक्रीया नागरिकांची निघत-उमटत होती.
आज २० ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी गावात दुपारपासून मुंबई व जळगाव येथील काही जी.एस.टी.अधिकाऱ्यांची वेगवेगळी टीम ठराविक व टारगेट केलेल्या व्यापाऱ्यांकडे पंधरा वीसच्या संख्येने अचानक हिशोबाचे दप्तर तपासणीसाठी धडकली, त्यामुळे बऱ्याच बड्या व्यापाऱ्यांच्या काळजात धडकी भरली गेली होती.म्हणून काही व्यापाऱ्यांनी स्वतः हून आपले प्रतिष्ठान मंगल करून घेतले.पण ज्यांच्याकडे हे जी.एस.टी.अधिकारी गेले.त्यांची मात्र पोळ्याच्या बैलासारखी वर्षातुन एकदा पंचपकवान देवून खातीरदारी न करता उलट दिवसभर दुकानातील व्यवहाराची-वस्तू विक्री व खरेदीच्या बीलाची तंतोतंत माहीती घेत,आवक जावकचा तपासणी-हिशोब मिळतो जुळतो का? याची शहानिशा केली व जिथे हिशोब जुळला नाही चोरी झाली आहे याची खात्री झाली,अशा दुकानांना सील लावल्याने,गावात बड्या-नावाजलेल्या लोकांच्या दुकानांचा व्यवहाराचा पर्दा फाश झाला आहे. तर दुसरीकडे गावात जे दुकानदार ग्राहकांना एक रूपया सोडत नाही, त्यांच्या सोबत असेच सील लावायचा कार्यक्रम व्हायला पाहिजेच्या प्रतिक्रीया नागरिकांमध्ये रात्रीपर्यत उमटत होत्या.
0 Comments