Header Ads Widget

*शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी येथे गट क्रमांक ५२२/१/२/३ येथील खदान बंद व्हावी म्हणून गेल्या १४ दिवसापासुन आमरण उपोषणाची आज सांगता*.

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
 मेथी येथील गट क्रमांक ५२२/१/२/३ येथील खदान बंद व्हावी म्हणून शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली योगेंद्र गिरासे,जगण गिरासे,बबन धोबी, विजय गोसावी,अमृत आगळे, भगवान सोनवणे व सुनील मिस्तरी यांनी दिनांक २/८/२०२५ रोजी आमरण उपोषणाला बसले होते त्या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिनांक १८/०८/२०२५ रोजी एक दिवसीय मा जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले त्यानंतर मेथी येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाची आज दिनांक १९/०८/२०२५ वार मंगळवार रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन मा. पंकज पवार साहेब प्र. जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड  यांनी लेखी पत्र उपोषण करत्यानां व खदान कंपनीचे प्रोजेक्ट इन्चार्ज बल्ला जगन रिशित यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे कि एस आर सी इन्फ्रा डेव्हलफर्स प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या वरीष्ठ अधिकारींशी चर्चा करणार  जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांची समाधान कारक चर्चा किंवा मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत मेथी ता. शिंदखेडा येथील खदान बंद राहील असे लेखी पत्र दिले त्यानंतर आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता करण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे,भरत भाईदास धोबी,खुमान सिंग विजय गिरासे, लखन काठेवाडी, जगदीश गोसावी, संजय गिरासे, योगेंद्र गिरासे, विजय गोसावी, जगतसिंग गिरासे, प्रविण माळी, सागर धनगर,बन्सीलाल सोनवणे, अमृत आगळे, योगेश पाटील, विद्या गिरासे, मंगल बाई धोबी,सदाशिव मिस्तरी, हिरा आगळे, भीमकोरबाई गिरासे, मोठया संख्येने महिला वर्गाची उपस्थित होती.परिसरातील शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments