Header Ads Widget

*शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील आठ वर्षीय आदिवासी चिमुकली बालिकेवर अमाणुस अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शासन व्हावी* *यासाठी शिंदखेडा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन*


       

 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-            शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील आठ वर्षीय आदिवासी चिमुकली वर अत्याचार झाल्याप्रकरणी तसेच धुळे जिल्हयातील आदिवासी समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचार बाबत शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस उपनिरीक्षक वैभव देशमुख यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य दिनी शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या अल्पवयीन आठ वर्षे चिमुकलीवर तिथेच वास्तव्यात असलेले किशोर काळे वय 28 या नराधमाने तिला पुस लावून तिचे अपहरण केले व तिच्याशी अमानुषपणे अत्याचार केला.ही मानव जातीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. शिरपूर तालुक्यात वारंवार आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार असे प्रकार होताना दिसत आहे. पोलिसांवरील विविध अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कठोर शासन व्हावे आणि आदिवासी समाजाला भयमुक्त करावे. धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यातील नुकतीच एका  तरुणाची हत्या केली होती. तसेच शिंदखेडा तालुक्यातील विरदेल 14 वर्षाची आदिवासी अत्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्दयी खुन करण्यात आला या घटनेस दोन अडीच वर्षाचा  कालावधी लोटला तरीही या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाला नाही. घटना होते, घडते पोलिस प्रशासनाकडे तक्रारी, नियोजन, मोर्चे काढले जातात परंतु कसुन चौकशी होताना दिसून येत नाही. म्हणूनच धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा पोलिसांवरील विश्वास दिवसेंदिवस उडत चाललेला आहे. कर्तव्यात कसुरी दिसत आहे.  येणाऱ्या काळात अशा आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच आरोपींना कठोर शासन व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे. तरच असे प्रकार वारंवार घडणार नाही सदर घटनेची  विशेष शोध मोहिम राबवून कठोर शासन व्हावे व नराधमास फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी भिल समाज विकास मंच शिंदखेडा यांच्या वतीने निवेदनातुन कारवाई करावी अशी मागणी केली.अन्यथा सदरील घटनेचा उद्रेक पाहता येणाऱ्या काळात संस्थेच्या वतीने शिंदखेडा तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आदिवासी समाजाचे जनआंदोलन उभे केले जाईल. यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.        यावेळी          दीपक दशरथ अहिरे संस्थापक अध्यक्ष.         भिल समाज विकास मंच शिंदखेडा महाराष्ट्र राज्य.जिल्हासचिव अशोक सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, जिभाऊ अहिरे,महेंद्र मालचे, कालु मोरे, भिल सेनेचे चंद्रदिप अहिरे, दिनेश सोनवणे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments