शिंदखेडा. (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-तालुक्यातील सुकवद येथील रब्बी हंगामातील एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मका पिकाचे नुकसान झाले होते सदर नुकसानीचे पंचनामे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी मनमानी पद्धतीने करीत खऱ्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न करता शासनाकडून मिळणारी भरपाई रक्कम पासून वंचित राहावे लागल्यामुळे आज शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे यांना शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव आप्पा पाटील व उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटलं आहे कि,शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील ज्यांचे मालकीचे शेतात यंदाचे रब्बी हंगामात बागायत उन्हाळी मका पिकाची लागवड केली होती मका जातीचे पीक सुमारे तीन महिन्याचे सहा फूट उंचीचे झाले होते व त्यास कणसेही लागले होते सदर कणसे कच्च्या अवस्थेत होती शेतकऱ्यांनी सदर पिके पेरणे आधी जमीन नांगरणे, वखरणे, रोटावेटर जमीन भुसभुशीत करणे, जमीन ट्रॅक्टरने मका बिजवायची पेरणी करणे खत देणे,निंदणी करणे, कीटकनाशकांची फवारणी करणे इत्यादी पोटी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे बराच खर्च केला पिक चांगले येईल या आशेवर सदर शेतकरी होते परंतु 3 एप्रिल 2025 च्या सुमारास अवकाळी पाऊस झाल्यामुळे मका पीक आडवे पडून पूर्ण पिकांची नुकसान झाले येणाऱ्या घास निसर्गाने शेतकऱ्यांकडून हिरावला म्हणून शेतकरी हातबल झाले याबाबत शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान पोटी अनुदान देण्याचे जाहीर केले केले होते परंतु तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक व तलाठी सुकवद येथील हे सुकवद येथे आले असता त्यांनी प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी व पंचनामे केले नाहीत सर्व पंचनामे घरीच गावात बसून केले ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक नव्हते त्यांनाही नुकसान भरपाई मंजूर झाली आहे अशा प्रकारे आम्ही सह्या करणारे सर्व शेतकरी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे कारण संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांनी मका पिकाची झालेल्या प्रत्येक शेतात जाऊन पाणी केली नाही व त्यांचे नुकसानाचे पंचनामे न करता योग्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार केली नाही व वशिलाबाजी करून शेतकऱ्यांचे नावाची यादी संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांनी केली व आम्हा शेतकऱ्यांचे प्रकार मका पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई आम्हा खालील शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे आम्ही खालील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे व शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रकमेपासून आम्हास वंचित राहावे लागत आहे. वरील नुकसानीमुळे आमचे फारच आर्थिक नुकसान झाले अशा प्रकारे संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांनी मनमानी करून खरोखर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेताची पाहणी व पंचनामे केली नाहीत त्यामुळे आम्ही खरे नुकसान ग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई रकमेपासून वंचित राहिलो आहोत तरी आपणास या निवेदनाद्वारे सर्व वंचित शेतकरी सुकवद येथील जे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात मका पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या पिकाची शासनाकडून आम्हास नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी विनंती करीत आहोत यावेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर्जेराव आप्पा पाटील, मा. शज्हरप्रमुख नंदकिशोर पाटील,विश्वासराव पाटील जिजाऊराव पाटील नवल पाटील ज्ञानेश्वर पाटील कृष्णा धनगर निंबा पाटील काशिनाथ पाटील संजय पाटील विलास पाटील विश्वास पाटील राजाराम पाटील रावण धनगर रोहिदास धनगर प्रशांत पाटील राजेश पाटील भानुदास पाटील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
0 Comments