Header Ads Widget

मुंबईत वारकरी साहित्य परिषद आयोजितवारीतील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आयोजित वारकरी साहित्य परिषद आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला फेटा घालून करण्यात आलेले स्वागत मनापासून भावले. वारीतील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी घेतला. या निमित्ताने त्यांचा या कार्यक्रमात सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मंत्री नामदार. संजय शिरसाठ यांनी हा सत्कार स्वीकारला. परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित वारकरी बंधू-भगिनींशी संवाद साधला. भारतीय संस्कृतीत संतांना खूप महत्त्व असून वारकरी संप्रदायाने दया, क्षमा, करुणा, प्रेम आणि समतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोचवला. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जात समाजाला एकत्र आणले. त्यामुळे वारीत कोणीही कोणाची जात विचारत नाही. ही चळवळ समानतेची, प्रेमाची, सहिष्णुतेची आणि अध्यात्मिक उन्नतीची होती. 

महाराष्ट्राला संतांची भूमी असून आपल्या संतांची शिकवण ही कोणताही भेदाभेद करू नये अशी आहे. संत ज्ञानेश्वरांनी भेदाभेद हा भ्रम, अमंगल असल्याचा संदेश दिला. संत नामदेवांपासून संत तुकारामांपर्यंत अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले. वारकरी संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती-पंथाच्या लोकांसाठी खुले असून त्यात भेदभाव नाही. संत चोखामेळा म्हणतात, आमचा विठोबा भेद करत नाही. त्याच्या कृपेने आम्हालाही पंढरपूरमध्ये विसावा मिळतो.

वारीतील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नावातच एकनाथ असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय तत्काळ घेतल्याचे मत व्यक्त केले. तसेच आगामी काळात शासन म्हणून आम्ही सर्वच मंडळी तुमच्यासोबत नेहमी आहोत, सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, माजी मंत्री प्रकाश आप्पा आवाडे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे राज्य अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील, ह.भ.प. माधव शिवणीकर, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, ह.भ.प. निवृत्ती नामदास, ह.भ.प. श्रीकांत हुलवान आणि वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, व तुकाराम महाराज यांचे11 वंशज रामेश्वर मोरे सदस्य तसेच या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी फडकरी मालक व नवाब व खानदेश विभागीय अध्यक्ष विशाल माळी पदाधिकारी वारकरी मंडळी उपस्थित होती.


Post a Comment

0 Comments