Header Ads Widget

*हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनता हायस्कूल मध्ये ध्वजारोहण* .*


   शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत  संपूर्ण भारतात सुरू असलेल्या तीन दिवसीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे पहिल्या दिवसाचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक प्रा.श्री जितेंद्र गोरख पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
    सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्या श्री एस.एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री डी एच सोनवणे ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
  या प्रसंगी स्त्री शक्तीचा आणि मानवीय मूल्यांचा उदाताविष्कार असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती पी यू पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा इतिहास विद्यार्थ्यांना आपल्या प्रास्ताविकातून करून दिला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.ए.पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए. टी.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments