धुळे: 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणेच तस्करीचा एक धक्कादायक प्रकार धुळ्यात समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर मोठी कारवाई करत, खाद्यतेलाच्या टँकरमधून होणाऱ्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी टँकरची तपासणी सुरू केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. टँकरमध्ये असलेल्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये चक्क ४०० बॉक्स विदेशी दारू लपवण्यात आली होती. ‘पुष्पा’ चित्रपटातील दृश्यांप्रमाणेच ही दारू लपवण्यासाठी खास गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ५६ लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हरियाणातून एका खाद्यतेलाच्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची गुजरातमध्ये तस्करी केली जात आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली नरडाणा गावाजवळ एक सापळा रचण्यात आला. संशयित टँकर तिथे येताच पोलिसांनी त्याला थांबवले आणि तपासणी केली. पोलिसांनी ही सर्व दारू आणि टँकर जप्त केला आहे. ही दारू तस्करी नेमकी कुठे आणि कोणासाठी केली जात होती, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments