प्रा. धिवरे हे म. दि. सिसोदे कला, वाणिज्य तथा विज्ञान महाविद्यालय नरडाणा या ठिकाणी हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत व शिंदखेडा येथील बी. के. देसले नगरचे रहिवाशी आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राजरत्न सामाजिक सांस्कृतिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेला सहकार्य करून अभ्यासिका व व्यायाम शाळेस हातभार लावला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एड्स जनजागृती,हर घर तिरंगा, राष्ट्रपुरुषाच्या जयंतीचे आयोजन, आदिवासी दिवस, शिवजयंती सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संविधान उद्देशिका वाचन, संविधान दिवस,वाचन संस्कृती अभियान, डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात सहभाग तसेच साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान. स्वतःचे दोन काव्यसंग्रह व पंधरा प्रातिनिधिक काव्यसंग्रहात सहभाग, महाराष्ट्रातील विविध काव्य संमेलनात काव्य प्रस्तुतीकरण केले. यातून अनेक मानाचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. याची दखल घेत विश्वशांती मानव सेवा समिती मार्फत राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक श्री सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
0 Comments