Header Ads Widget

संविधान दिनानिमित्त बेटावद येथे भव्य रक्तदान शिबिर व संविधान प्रस्तावना वाचन संपन्न

बेटावद प्रतिनिधी. 

बेटावद येथे भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आणि संविधान प्रस्तावना वाचन अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय, विकास सोसायटी, समस्त ग्रामस्थ मंडळी व युवा तरुण मित्र मंडळी - बेटावद यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाले
सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचा प्रारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला ग्रामपंचायत बेटावदचे सरपंच मंगलचंद जैन आणि ग्रामसेवक प्रमोद खलाणे यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित सर्व समाज बांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले हे वाचन बलराज थोरात यांनी केले
याप्रसंगी सरपंच मंगलचंद जैन, मंगेश पवार, राजू माळी, ग्रामसेवक प्रमोद खलाणे, बलराज थोरात, विलास महाले, अशोक वाघ, महेंद्र माळी, गणेश माळी, भाऊसाहेब कोळी, विष्णू पेंटर, रमेश थोरात, सिताराम थोरात, मधुकर बागुल, मोहन मैराळे, सुमित झालटे, कांतीलाल पवार, यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
'रक्तदान श्रेष्ठदान' या उदात्त हेतूने संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती
या शिबिरासाठी स्व. श्री. मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर, शिरपूर यांचे सहकार्य लाभले रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी विशेष उपक्रम राबवला. स्व. श्री. मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर, शिरपूर यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास वीस लिटरचा पाण्याचा जार विनामूल्य भेट म्हणून देण्यात आला तसेच, ब्लड सेंटरतर्फे प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
या रक्तदानाची सुरुवात सर्व प्रथम
बेटावद येथील ग्रा.प.अधिकारी प्रमोद खलाणे, यांनी केली.यावेळी बेटावद ग्रा.प.चे सरपंच मंगलचंद जैन,ग्रा.प.चे माजी उपसरपंच गणेश माळी, व एड. वसंत पाठक ,बेटावद वि.का.संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बलराज थोरात, सामाजिक कार्यकर्ते आर.आर.सोनवणे,
भाजपा तालुका सरचिटणीस महेंद्र माळी,ग्रा.प.सदस्य विरेंद्र पवार, अनुसूचित जाती चे जिल्हा उपाध्यक्ष करूणानिधी महीरे, वसंत सुका माळी,इ.सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते 

बेटावद येथील या दुहेरी सामाजिक उपक्रमाने भारतीय संविधानाप्रती आदर आणि गरजूंना मदत करण्याची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली.

Post a Comment

0 Comments