Header Ads Widget

नरडाणा पोलिसांची कारवाई होळ येथे हातभट्टीवर नरडाणा पोलिसांचा छापा; ४६,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त एकावर गुन्हा दाखल.


आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर नरडाणा पोलिसांनी आपली कारवाई तीव्र केली आहे.  नरडाणा पोलिसांनी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी शिंदखेडा तालुक्यातील होळ शिवारात धरण किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर धाड टाकून तब्बल ४६,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि नष्ट केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नरडाणा पोलिसांच्या पथकाने होळ गावाच्या शिवारात धरणाकिनारी छापा टाकला. यावेळी नामदेव शामराव भिल (रा. होळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) नावाचा इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून त्याची चोरटी विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले
 त्याचे ताब्यात एकुण २४ प्लास्टीकचे ड्रम त्यात ८४० लिटर वॉश प्रति लिटर ५०/-रु. प्रमाणे ४२,०००/-रु.किं.चा तसेच ३० लिटर गावठी हातभट्टीची दारु प्रति लिटर १००/-रु. प्रमाणे ३,०००/-रु. किं.ची व गावठी हातभट्टीची दारु बनविण्याचे साहीत्य १७००/-रु.किं.चे असा एकुण ४६,७००/-रु. किं.चे मुद्येमाल कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक  अजय देवरे व मा. सुनिल गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी  यांचे मार्गदर्शनाखाली नरडाणा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोउनि/रविंद्र महाले, असई/हेमंत पाटील, पोहेको/ललीत पाटील, रविंद्र मोराणीस, अनारसींग पवार, योगेश गिते, भरत चव्हाण, पोना/भुरा पाटील, पोकों/अर्पण मोरे, सचिन बागुल, विजय माळी, विनोद कोळी तसेच ग्रेपोसई/अजय सोनवणे अशांनी मिळुन केली आहे.

Post a Comment

0 Comments