----------------------------------------------
पाष्टे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून पाष्टे येथील साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि राष्ट्रीय
अभिमानाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती. पी. एस. पाटील होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ग्रंथाच्या पूजनापासून झाली. पूजन प्रा. एम. एम. वारुडे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध राष्ट्रीय महापुरुषांचे प्रेरणादायी सजीव देखावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महात्मा गांधी सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, पंडित रमाबाई , आनंदीबाई जोशी,श्रीमती इंदिरा गांधीआदी थोर नेत्यांचे सजीव चित्रण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उभे केले. या देखाव्यांची नयनरम्य मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली. "संविधान आमचा श्वास", "समानता आमचा मान", "भारत माझा देश आहे" अशा देशभक्तीपर घोषणांनी पाष्टे गाव दुमदुमून गेले.
संविधानाची गरज, त्याची रचना, त्याचे महत्व आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन करताना श्री.नितीन बैसाणे सरांनी विद्यार्थ्यांसमोर संविधानाच्या मूल्यांची सखोल मांडणी केली. प्रत्येक घटकाला व्यक्तीला वर्गाला उचित न्याय कसा दिला व त्यांनी संविधान केवळ एका पुस्तकाचे नाव नसून देशाच्या भविष्यास दिशा देणारी मूलभूत आचारसंहिता असल्याचे अधोरेखित केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी "माझे संविधान – माझा देश", "राष्ट्रीय एकता", "समानता" आदी विषयांवर आकर्षक चित्रे सादर करून कलागुणांची चमक दाखवली. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार संविधान विषयक प्रश्नमंजुषा देखील उत्साहात घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रशंसनीय गुण संपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री एस. एल. पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. वाय. एस. सनेर, प्रा.एल. एस. भोसले, श्री व्ही. एन. पाटील, श्री व्ही. आर. अहिरे, श्री पी. एस. जाधव, श्री एस. जी. पाटील, श्री डी. ए.मासुळे श्री पी एम पाटील श्री एम ए. सोनवणे श्री आर आर शिरसाठ, भूषण पाटील यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments