Header Ads Widget

*मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नंबर3 मध्ये अतिशय निकृष्ठ दर्जाचे तांदुळ, गहू वाटप.*

 
 
मालपूर प्रतिनिधी.  प्रभाकर आडगाळे.
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकान नं3 मध्ये म्हणजेच एकवीरा माता स्वयं साहय बचत गट मध्ये अतिशय निकृष्ठ दर्जाचे तांदुळ आणि गहू रेशन दुकानात आले आहे हे पुराठाधिकारी यांना दिसत नाही का? असा निकृष्ठ दर्जाचा तांदुळ फक्त पशू पक्षीच खाऊ शकतील जर सरकारला मोफत धान्य वाटपाचा कंटाळा येत असेल तर गरीब जनतेला चुरी युक्त तांदुळ गहू देणे बंद करा 
 
रेशन दुकानदार म्हणतो की वरून जसा माल आला तसा आम्ही देऊ. 
पुरवठा आधिकारी साहेब व महसूल विभाग लक्ष देवून स्वस्त धान्याचा उच्च प्रतिचा माल पाठवण्याची कृपा करावी अशी गरजू गरीब महिला माताची विनंती आहे यावेळेस हा माल घेवून जातो परंतु यापुढे असा खराब माल पाठवू नका या बाबतीत दोंडाईचा तहसिलदार साहेव . लक्ष देतील का ? 
 
गोडावून मधून माल आणतांना दुकानदाराने माल पाहूनच आणला पाहिजे अस संतप्त महिलांचे म्हणणे आहे

Post a Comment

0 Comments