Header Ads Widget

होळ येथे श्रीराम मंदिरावर ना. जयकुमार भाऊंनी फडकविला भगवा ध्वज व अर्पण केले महा त्रिशूल व समई.

.

नरडाणा:  नागदिवाळी व मार्गशीर्ष महिन्यातील शुक्लपक्ष प्रभू श्रीराम व सीतामाता विवाह पंचमी या दिव्य संयोगदिनी तेज व शौर्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी अयोध्येत राम मंदिरावर फडकविला याच मुहूर्तावर होळ येथील श्रीराम मंदिरावर मा. राज्याचे पणन ळ राजशिष्टाचार मंत्री तथा  पालकमंत्री धुळे ना. श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभहस्ते भगवा ध्वज फडकविला.
   
    याच मुहूर्ताचे औचित्य साधून होळ येथील महादेव शंकर व राम भक्त जवान श्री. नितीन देवरे यांनी सेवानिवृत्तीनिमित्त पंचमुखी महादेव मंदिरासमोर 31 फूट उंचीचा त्रिशूल तर श्री. सिद्धार्थ सिसोदे यांनी 15 फुट उंचीची लाइटिंगची समई भक्ती भावा ही अर्पण केली.  या दोन्ही  शुभ प्रतीकांचे ना. जयकुमार भाऊ रावल यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करुन स्थापना करण्यात आली. यावेळी नितीन देवरे आई-वडील सौ.मीराबाई व पांडुरंग देवरे व सिद्धार्थ सिसोदेचे आई-वडील सौ. संजीवनी व संजय सिसोदे यांनीही पूजन केले. दुपारी दोन वाजेपासून त्रिशूल व समईची  संपूर्ण होळ गावातून पंचमुखी महादेव व श्रीराम मंदिरापर्यंत सवाद्य शोभायात्रा निघाली. गावातील महिलासह आबालवृद्ध भक्तीभावाने शोभायात्रेत  सहभागी झाले होते.

    श्रीराम मंदिराचे ध्वजारोहण, त्रिशूल व समई पूजनानंतर मंत्री जयकुमार भाऊंच्या हस्ते श्री महादेव व श्रीरामाची आरती पुजारी श्री चंद्रशेखर गुरव व ह.भ.प.धोदू तुळशीराम महाराज यांनी करून घेतली. यानंतर महाराष्ट्र राज्यात व दोंडाईचा नगरपालिकेत प्रथमच ऐतिहासिक, बिनविरोध महाविजयाबद्दल मंत्री जयकुमार भाऊंचा नरडाणा जि प गटाच्या वतीने  ह्रदय सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मंत्री महोदय म्हणाले की, आपल्या हिंदू संस्कृतीत भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम शौर्य व आदर्शाचे प्रतीक आहे. म्हणून प्रभू श्रीराम व सीतामाता विवाह पंचमी या दिव्य संयोग दिनी होळ गावातील श्रीराम मंदिरावर तेज शौर्य शांतीचे प्रतीक असलेला ध्वज फडकविण्यचा मान अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे होळ मध्ये मला मिळाला याचा मला अभिमान वाटला. प्रभू श्रीराम व पंचमुखी महादेव आपल्या शिंदखेडा तालुक्याला व बळीराजाला सुख, समृद्धी देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. जवान श्री. नितीन देवरे यांनी शौर्य व सुरक्षेचे प्रतीक त्रिशूल व श्री सिद्धार्थ सिसोदे यांनीही समृद्धी व प्रगतीचे प्रतीक असलेले प्रज्वलित समई होळ गावाला अर्पण केली व अयोध्याप्रमाणेच होळ श्रीराम मंदिरावर मला तुझी फडकवण्याचा मान दिला याबद्दल दोघांसह आयोजकांचे  कौतुक केले.

  या कार्यक्रमास भाजप दोंडाईचा मंडळ अध्यक्ष श्री. दीपक बागल, शिंदखेडा मंडळ अध्यक्ष श्री. मोतीलाल वाकडे, नरडाणा जिल्हा परिषद गटातील सरपंच सह  प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्री अतुल पाटील. सर यांनी केले. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन  माजी सभापती जि प संजीवनी सिसोदे, सरपंच सौ. दिपाली पाटील, श्री टी के पाटील सर, भटू पाटील, मनोज तात्या, महेंद्र खैरनार, राहुल पाटील सह ग्रामस्थांनी केले होते.

Post a Comment

0 Comments