मुंबई- हिंदी पत्रकारितेचे मुळ कोकणातील असून हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर हे मालवण तालुक्यातील पराड गावचे. त्यांचे काशी येथे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच स्मारक सिंधूदुर्गात उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शासनाच्या या निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले असून कालापव्यय न होता त्वरीत स्मारक उभारावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले केले की, आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले गावचे.. त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला.. दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले.. 200 वर्षानंतर आता या महापुरूषांचे स्मारक सिंधुदुर्गात उभे राहिले आहे.. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि अ. भा. मराठी पत्रकार परिषदेला सलग 20 वर्षे पाठपुरावा करावा लागला.. मराठी प्रमाणेच हिंदी पत्रकारितेचं मूळ देखील कोकणातलं आहे.. हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पराड गावचे..बाबूराव पराडकर हे हिंदी पत्रकारितेतील मोठं नाव..निर्भीड, समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रेरणास्थान असून आजही हिंदी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सर्वोच्च मानले जाते. कोकणच्या या सुपूत्राचे काशी येथे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.मात्र त्यांच्या मूळ गावी पराड येथे स्मारक नाही..याची खंत परिषदेला होती.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने पराडकर यांचे त्यांच्या गावी स्मारक उभारावे अशी मागणी सातत्यानं केली होती.. एवढेच नव्हे तर मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदिंनी पराड गावाला भेट देऊन स्थानिकांशी या संदर्भात चर्चा केली होती.. 2019 मध्ये हा दौरा केला होता.. या दौऱ्यात त्यांनी पराडचे सरपंचांशीही चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली होती.. त्यानंतर तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेऊन स्मारकासाठी जिल्हा परिषदेनं जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती.. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.. त्या यानंतर हा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते.. मात्र नंतर कोरोना मुळे या विषयाचा पाठपुरावा करता आला नाही.. माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी देखील पराडकरांवर पुस्तक लिहून त्यांचे पराडला स्मारक व्हावे असे पत्र सरकारला लिहिले होते.. मुंबईतील अनुराग त्रिपाठी आणि काही हिंदी भाषक पत्रकारांनी स्मारकासाठी पाठपुरावा केल्याचे आठवते.. असे नमूद करीत उशिरा का होईना सर्वांच्या या प्रयत्नांना यश आले असून बाबूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी सरकारने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे.. समितीने पुढील 7-8 दिवसांत जागा निवडीचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. सरकारच्या या निर्णयाचे परिषदेने स्वागत केले आहे.. अगोदरच फार उशीर झाला आहे, आता कोणताही कालापव्यय न करता कोकणातील या महान पत्रकाराचे स्मारक लवकरात लवकर उभारावे ही अशी विनंती मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
****
0 Comments