मालपूर गावात गेल्या काही दिवसांपासून गावगुंड मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अंगणवाडीसह शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बाहेरूनही काही कुत्र्यांचा प्रवेश गावात झाल्याची चर्चा आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासकांकडे जातीने ध्यान घालून वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांशी बोलताना ग्रामस्थांनी बंदोबस्त न केल्यास प्रशासकांवर जिवीतहानीचा गुन्हा नोंदवला जाईल, असा इशाराही दिला आहे. लवकरच शिंदखेडा पंचायत समितीकडे मोर्चा नेण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असल्याने तात्काळ उपाययोजना करून, गावातील नागरिकांना दहशतीपासून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे��.
0 Comments