मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे भारतीय किसान संघाची बैठक संघाचे आखिल भारतीय मंत्री मा बाबुभाई पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते तसेच प्रांतमंत्री मा सुभाष महाजन जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटोळेसर जिल्हा मंत्री दतू माळी जिल्हा सदस्य उत्तम तावडे संगिता जाधव मॅडम, शिवप्रसाद शेवाळे तालुका अध्यक्ष रणवीर पाटील उपाध्यक्ष भोजूसिंग गिरासे तालुका मंत्री संजय बागुल सहमंत्री हरपाल गिरासे गोटू गिरासे समाजीराव बागल आणि शिरपुर धुळे शिंदखेडा साक्री तालुक्यातील किसान संघाचे सदस्य उपस्थितीत होते दोन सत्रात संघाची बैठक घेण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बाबुभाई पटेल भारतीय किसान संघ का कार्यक्रम हा त्री सुत्री कार्यक्रम आहे १ ) संघटनात्मक कार्य
२ ) रचनात्मक कार्य
3 ) आंदोलनात्मक कार्य
अशा त्री सुत्रांनी कार्यकम केला जातो.
शिवप्रसाद शेवाळे यांनी सुत्र संचालन केले तर सुरेश पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments