Header Ads Widget

*राजकीय टोळी युगाची चाहूल,लोकशाहीच्या मानेवर बसलेलं अदृश्य घोंगडं...**बिनविरोध झालेल्या नगरसेवकसोबत,फार्म मागे घेणाऱ्या उमेदवारांच्या वेदना-मुलाखती जनतेसमोर मांडाव्यात-दाखवाव्यात...*



*आज प्रश्न कोण जिंकला हा नाही, प्रश्न असा आहे की जिंकण्याचा अधिकार जनतेकडे उरला आहे का?...*

*जर नाही,तर ही लोकशाही नाही-ही निव्वळ सत्ता आणि भीतीने चालवलेली टोळीशाही असल्याचे जनतेचे मत...*

*जनमत-*

*दोंडाईचा-*
भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकाधारीत प्रणाली म्हणून ओळखली जाते.परंतु अलीकडे देशाच्या अनेक लहान मोठ्या भागात दिसणाऱ्या राजकीय घडामोडींना एक नवा प्रवाह-चाहूल जन्माला येऊ घातली आहे- *"राजकीय टोळी युगाची चाहूल"* कायद्याच्या दृष्टीने हा कोणताही वैधानिक शब्द नाही, परंतु जनतेच्या अनुभवातुन निर्मित झालेला, *"सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक शक्तींचे संगनमत करून एक अनौपचारिक गटशाही तयार होणे"*
याला जनमानसाने जनमतातुन दिलेले अचूक नाव आहे.
थोडक्यात, एकीकडे लोकशाहीला “जनतेचे राज्य” म्हणतात. पण आज जे उभं राहतंय ते लोकशाही नसून सत्तेवर बसलेल्या टोळींचा उघड उघड खेळ आहे. कायद्याची भाषा आणि संविधानाची चौकट कायम ठेवून, आतून यंत्रणेचा गळा दाबण्याचं तंत्र इतकं बारकाईने राबवलं जातंय की जनतेला सत्य कळेपर्यंत सर्व काही ठरलेलं असतं,हे बिनविरोध नगरसेवक झालेल्या घटनेने एकदा परत सिद्ध-सत्य झाले आहे,असे गावातील जागरूक जनता म्हणत आहे.

प्रतिनिधी लोकशाही (भारतीय संविधान कायदा 324,325,326 नुसार) जनतेला स्वातंत्र्याने मतदान, निवडणूक आणि मतप्रक्रियेत सहभागाचा हक्क आहे-देते.रिप्रझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट-1951 निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष आणि दहशत-धमक्यापासुन मुक्त असणे आवश्यक आहे,असं सांगतो.
पण वास्तव? म्हणजे *टोळी युगात* प्रत्यक्षात उलट होते. *-निवडणुक अस्तित्वात असते,पण स्पर्धा अस्तित्वात राहत नाही.*
विरोधकांना नामांकन भरू न देण्यासाठी दबाव-अडथळे आणणे, धाक, बळी, खोटे गुन्हे, चौकश्या यांचा पेरणी हंगामच शेवटपर्यंत सुरू ठेवला जातो-असतो.
कायद्याच्या  सेक्शन  33 नुसार कोणालाही स्वयंसिद्ध हक्काने नामांकन अर्ज दाखल करता येतो आणि 36 नुसार अर्ज फेटाळण्याचे कारण केवळ कायदेशीर मर्यादित कारणे असावेत; पण टोळी युगात मात्र मैदानात “टोळीचे नियम” चालतात. निवडणुकपूर्व दडपशाही, दबाव,धाक,पोलीसी पाळत, यामुळे नामांकन स्वतः च रोखले जाते.कायदा बाहेरून मोडला जात नाही.पण नैसर्गिक न्यायाचा संहार होतो. सेक्शन 53 मध्ये बिनविरोध निवडून येण्याची तरतुद आहे.परंतु ही तरतुद जनतेच्या स्विकुतीवर आधारीत असावी.म्हणूनच बिनविरोध निवडणुका ही लोकशाहीची उपलब्धी नाही-ती *धाकाच्या राजकारणाची कबुली*  आहे. आज अनेक ठिकाणी विरोधक "*उभा राहायला घाबरला-घाबरतो"* ही परिस्थिती लोकशाही नाही,तर एक प्रकारची हुकूमशाहीचे चित्र स्पष्ट दाखवत आहे. म्हणून बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकसोबत फार्म मागे घेणाऱ्या उमेदवारांच्या वेदना-मुलाखती जनतेसमोर मांडायला-दाखवायला हवेत.कारण नामांकन भरायला दहा दिवस असताना विरोधकांनी सत्ताधारी पक्षाची भिती ठेवत नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच का गर्दी केली? आणि मोठ्या मुश्किलीने नामांकन दाखल झाल्यानंतर चार दिवस विरोधक मोबाईल बंद ठेवून कुठे भितीने गहाळ होते व माघारीच्या दिवशीच कसे गावात आले व माघार घेतली-कोणी घ्यायला लावली, यांचाही ऊहापोह-मुलाखतीतुन जनतेसमोर व्हायला हवा.

शेवटी संविधान आर्टीकल 50 नुसार न्यायालयीन स्वायत्तता,-आर्टीकल 14 : नुसार सर्वांना समान न्याय म्हणतं. सी.आर.पी.सी./बी.एन.एस.एस. सेक्शन 154,41 इ.नुसार पोलीसांची जबाबदारी कायद्याप्रमाणे कार्य करणे,असे म्हणतं.

मात्र टोळी राजकारणात- पोलीस/प्रशासन यांच्यावर *"अदुश्य दबाव"* त्यांचे स्वातंत्र्य गमावले जाते आणि कायद्यापेक्षा आदेशांना प्राधान्य दिले जाते.
हे संविधानिक नैतिकतेचे घातक क्षरण आहे.
 आर्टीकल 326  प्रजातंत्राचा मूळ हक्क-मुक्त मतदानाचा हक्क आहे.
पण जनतेलाच आज वाटू लागलंय की मत देणं म्हणजे निर्णय नाही, फक्त विधी आहे.
मतदार थेट सांगतो- *“निवडणूक आधीच ठरलेली होती.”*
ही लोकशाहीची सर्वात मोठी लाज.

राजकारणात आज दोन भिती एकत्र आल्या-येतात-
सत्ताधाऱ्यांची सत्ता हरवण्याची भिती,
विरोधकांनी भोगलेली खास्ती, दडपशाही, आर्थिक तोडफोड

ही दोन्ही भिती मिळून लोकशाहीचा गळा आवळतात, आणि सत्तेचं एकाधिकारशाही स्वरूप लोकशाहीच्या नावाखाली लपवलं जातं.

लोकशाही जिवंत आहे असा दावा कागदावर दिसतो,
पण वास्तवात ती टोळींच्या स्वार्थाच्या रगाड्यात ओढली गेली आहे.

*आज प्रश्न कोण बिनविरोध जिंकला हा नाही;*
*प्रश्न असा आहे की जिंकण्याचा अधिकार जनतेकडे उरला आहे का?*
*जर नाही, तर ही लोकशाही नाही-*
*ही निव्वळ सत्ता आणि भीतीने चालवलेली टोळीशाही आहे,असे गावातील जागरूक जनता गावात दबक्या पण स्पष्ट मोठ्या आवाजात आपले मत एकमेकांजवळ मांडत आहे.*

Post a Comment

0 Comments