Header Ads Widget

*मालपूर येथील मध्यम प्रकल्पांकडे जळगाव पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष बांधावर वाढलीत काटेरी बाभुळ*

मालपूर प्रतिनिधी प्रभाकर धनगर. 
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तसे जिल्ह्यांतील2 नंबरचे डॅम म्हणून ओळखले जाते. 
इंजिनियर महोदय डॅम बघण्यास सुद्धा येत नाहीत. इथे लाईट देखील खांभ्यावर दिसत नाहीत 
धरणाच्या बांधावर मोठमोठे काटेरी बाभूळ दिसून येतात त्याची साफ सफाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे तसेच पोटचाऱ्या करण्याची देखील रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे मार्च एन्ड पर्यंत पोट चाऱ्या न झाल्यास अमरावती मध्यम प्रकल्यावर कोणत्याही इंजिनियर किंवा जळगाव पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मालपूर अमरावती धरणाकडे वळू देणार नाही. 
असा ईशारा शेतकऱ्यांनी केली आहे लक्ष न दिल्यास शिंगाडा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार असल्याचा मानस आहे. 
सदर इंजिनियर यांनी काटेरी बाभूळ साफ सफाई करून आणि संबंधीत अधिकाऱ्याशी संपर्क साधून पोटचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे

Post a Comment

0 Comments