बीड : देवडी येथील स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी देवडी येथील माणिकबागेत आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष श्री. पोपटराव पवार आणि उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे..
प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारया मान्यवरांचा दरवर्षी गौरव केला जातो.. 2024 च्या पुरस्कारांसाठी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक सेवा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, किसानपूत्र आंदोलनाचे प्रणेते श्री. *अमर हबीब* यांना जाहीर करण्यात आलेला आहे.. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली 45 वर्षे कार्यरत राहून जनतेला न्याय मिळवून देणारे माजलगाव समाचारचे संपादक श्री. *सुहास देशमुख* आणि कृषी क्षेत्रातील अनेक अडचणींवर मात करून शेतीत विविध प्रयोग करणारे शेतकरी श्री. *गोरख झाटे* यांची निवड करण्यात आली आहे.. या सर्व मान्यवरांना 14 डिसेंबर रोजी पोपटराव पवार आणि मंगेश चिवटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.. यावेळी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने बीड जिल्हयातील काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे..तसेच अपंगांसाठी कार्य करणारे मुंबईचे पत्रकार दीपक कैतके आणि मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप सपाटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.. यावेळी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत..
या कार्यक्रमास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे...
0 Comments