Header Ads Widget

*पालिका निवडणूकीत राडा, धिंगाणा, आणि पैशाचा पाऊस, या बाजारूपणाला मिळाली प्रतिष्ठा?!!*



काल महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूकीचे मतदान झाले,घटनाकारांना  मतदानाचा दिवस हा दिवाळी सारखा उत्सव साजरा करावा असे अभिप्रेत असतांना, महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या मतदान केंद्रावर जे चित्र दिसून आले त्याला उत्सव म्हणता येणार नाही तर त्याला तमाशा म्हणावा की शिमगा म्हणावा लागेल ?!  महाराष्ट्रात झालेल्या मतदान केंद्रावर नेंत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इतका धिंगाणा घातला की पोलीसांना कार्यकर्त्यांना आवर घालणे मुश्किल झाले होते, आजच्या राजकारण्यांनी " गॅग वॉर "चे स्वरुप देऊन मतदानासारख्या  पवित्र  कार्याला बदनाम केले, या पुढे निवडणूका घ्यायच्या किंवा नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे,काल महाराष्ट्रात बीड परळी महाड मालवण, मुक्ताईनगर,परभणी, जवळपास सर्वच ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूकीच्या  मतदान केंद्रावर पोलीसांचा कडक बंदोबस्तात महायुतील कार्यकर्त्यांनी घातलेला प्रचंड धिंगाणा महाराष्ट्रातील तमाम जनतेने विविध वृत्तवाहिन्यांवर पाहिला, निवडणूक काळात काल पर्यंत मतदान केंद्रावर सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा नेहमी दिसणारा संघर्ष या वेळी मात्र दृश्य या उलट होते,यंदा महाराष्ट्रात पालिका निवडणुकीत ठिकठिकाणी मतदान केंद्रावर राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षातील आप आपसात पेटलेला पराकोटीचा संघर्ष पहावयास मिळाला. हे ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणता येईल! महायुतीत असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणाचे वर्चस्व असावे यासाठी चाललेला आटापिटा! महाराष्ट्रात सत्तेत कोण मोठा भाऊ या साठी यंदा भाजप विरुद्ध सेना, सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस,अशा प्रकारेची आप आपसात असलेली सत्तेसाठी असलेली चुरस तमाम जनतेला पहावयास मिळाली, यंदाच्या निवडणुकीत सापडलेले नोटांचे पैशांचे बंडल, पैशांचा पाऊस, मतदानाच्या दिवशी रात्र भर घरांचे दरवाजे उघडे ठेवण्याचे मंत्र्याचे फर्मान हे ह्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणता येईल, महायुतील  आमदारांनी पैशांचे बंडले सोबत मतदार याद्या,ही सगळी सामग्री त्यांच्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये,गाड्यांमध्ये पकडून दिल्याचे चित्र महाराष्ट्रात निवडणुकीच्या काळात पहिल्यांदा पहावयास मिळते आहे,यंदांची नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूकीत धिंगाणा, राडेबाजी, मारामारी,पैशांचा महापूर असे आचार संहिता तेचे सर्व नियम पायदळी तुडवून इतिहास घडविण्याचे काम सत्तेतील असलेल्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसांनी केले हे मात्र नक्की?! महायुतीत असलेला  आमदार आपल्याच महायुती तील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून  स्ट्रींग ऑपरेशन करत मतदारांना पैसे वाटप करतांना पकडून देतो. महायुतीतील घटक पक्षांच्या एका विधवा महिलेला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात भल्या पहाटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जावं लागतं,?!! कशाला लोकशाहीच्या  गप्पा मारतात?!,याला लोकशाहीचा उत्सव म्हणावा की लोकशाहीची क्रूर थट्टा ?!!! निवडणूक आयोगाने यात अधिक कहर केला, निवडणूक केव्हा घ्यावी, केव्हा मतदान घ्यायचं, केव्हा स्थगिती द्यावी, केव्हा मतमोजणी करायची, केव्हा निकाल जाहीर करायचा, याचा सगळा सावळा गोंधळ निर्माण करून ठेवला ?! कोणाला कोणाचीच पडलेली नाही,?!सत्तेतला प्रत्येक घटक पक्ष म्हणतो माझ्याच हातात सत्तेची चावी,दुसरा म्हणतो माझ्या हातात तिजोरी ची चावी, तिसरा म्हणतो तिजोरीचा मालक आमचाच,?!पण राजकारणी जनतेच्या हातात राज्याची तिजोरीची चावी द्यायला तयार नाहीत,?!  एकीकडे सत्ताधाऱ्यांनी राज्यावर आठ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवलं आहे,?!! दुसरीकडे मंत्री आमदार खासदारांच्या घरी करोडो रुपयांचा महापूर ?!!! सरकारकडे शेतकऱ्यांच्या पीकांची नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत दुसरीकडे अर्थ मंत्र्याचा मुलगा १८०० कोटी किंमत असलेली जमीन कवडीमोलाने विकत घेतोय?!!!! निवडणुकीत काही कोटी रुपये खर्चून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून करोडों रुपयांची तीन पिढ्यांची सोय करायची, आता तर नगराध्यक्ष पदे  आपल्याच घरात ठेवण्यासाठी कोकणात मंत्री राणें च्या मतदारसंघ असलेला कणकवली ला एका मताला १५ हजार, तर मालवण मध्ये २५ हजार रुपये वाटले गेले, खुद्द  नंदूरबार शहरात नगराध्यक्ष पदासाठी एका मताला काही प्रभागात १२हजार रुपये रूपये फुली वाटली गेली?!, असे करोडो रुपये नगराध्यक्ष पदासाठी वाटली जात असतील कोणता कार्यकर्ता नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभा राहिल,?! करोडो रुपये निवडणुकीत खर्च करून  कार्यकर्त्यांना असलेली पदे सुध्दा आपल्याच घरात ठेवायची, कार्यकर्त्यांना निवडणूका लढवायची जागाच शिल्लक ठेवायची नाही? लोक शाहीचे दिवाळीचे आकाशकंदील  फक्त मंत्री आमदार खासदार याच्याच घरी लावले जातील आणि  विजयी मिरवणूकीत जी उद्याची पिढी नाचते आहे किंवा नाचवली जात आहे ती ह्याच पैशावर?! विजयी मिरवणूकीत नाचण्या पलीकडे नव्या पिढीला कोणतेच काम शिल्लक राहणार नाही,?!!
  🌸 अरूण पाटील 🌸
       

Post a Comment

0 Comments