Header Ads Widget

शिंदखेडा भाजपा कार्यालयात महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी


प्रतिनिधी l शिंदखेडा : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती ११ एप्रिल २०२६ शनिवारी महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने व माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात भाजपा शिंदखेडाच्या वतीने सकाळी नऊ वाजता भगवा चौकातील भाजपा कार्यालयात म जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महात्मा फुलेंच्या समताधिष्ठित समाज निर्मितीच्या योगदानाबद्दल जोतिराव फुलेंना आदराजंली अर्पण केली.यावेळी “जय ज्योती” “जय क्रांती” "छत्रपती शिवाजी महाराज की जय ",च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला. प्रविण माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
 प्रसंगी गटनेते प्रतिनिधी चेतन परमार,माजी गटनेते अनिल वानखेडे,उपनगराध्यक्ष उदय देसले, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, माजी उपगराध्यक्ष भिला पाटील,यु्वराज माळी,उल्हास देशमुख, न पं सभापती प्रतिनिधी गोविंद मराठे, अबु कुरेशी,नगरसेवक सुयोग भदाणे,ज्ञानेश्वर सकट,प्रतिनिधी गुलाब सोनवणे, चंद्रकांत भील,माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील,गोपाल चौधरी, दिनेश माळी,संदीप राजपूत, संजय जाधव,त्र्यंबक माळी,निलेश कापुरे,बबलू देवरे, वाय पी खैरनार, राहुल महिरे,बाळासाहेब गिरासे, गणेश परदेशीं यांचे सह मोठ्या संख्येने माळी समाज बांधव, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments