Header Ads Widget

*शिंदखेडा येथे कॉंग्रेस पक्षाचा "सृजन संघटन अभियानात कार्यकर्त्यांशी संवाद* *सृजन अभियानातून होणार पक्षबांधणी -योगेश दीक्षित*

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे  कॉंग्रेस पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आणि निष्ठावान कार्यकत्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभरात "सृजन संघटन अभियान" राबविले जात आहे. या अभियानांतर्गत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांसह विविध ११ सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल अशी माहिती काँग्रेसच्या सूजन संघटन अभियानाचे निरीक्षक योगेश दीक्षित यांनी शिंदखेडा येथे काँग्रेसच्या सृजन संघटन अभियान कार्यकर्ता संवाद बैठकीतुन 
काँग्रेसच्या सृजन संघटन अभियान अनुषंगाने अभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना श्री. दीक्षित यांनी माहिती दिली.हयाप्रसंगी अभियानाचे ए आय सी सी सदस्य व धुळे जिल्हा निरीक्षक योगेश दीक्षित, धुळे जिल्हा निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे,जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे,प्रदेश सरचिटणीस डॉ. दरबारसिग गिरासे, प्रमोद सिसोदे, साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे,आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे नगरपंचायत माजी विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी राहुल पाटोळे, काँग्रेसचे सेवादलाचे परीक्षित देशमुख, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष पंकज निकम,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यमराज पाटील माजी सभापती पंचायत समिती शिंदखेडा डॉ. जयवंत बोरसे माजी सरपंच धमाणे आबा मुंडे माजी उपसरपंच खलाणे खंडेराव भदाणे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 
देशभर याची अंमलबजावणी सुरू असून,त्यानुसार पक्ष निरीक्षक शिंदखेडा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली .हयासाठी जे गेले ते जावु दया निष्ठावंत कार्यकर्ते व सक्रिय पदाधिकारी ची नेमणूक प्रत्यक्ष मुलाखती द्वारे घेण्यात आल्या हया इच्छुकामध्ये जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष या पदाकरिता मुलाखती दिल्या या प्रक्रियेचा गोपनीय अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि त्यानंतरच सक्षम पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, असे श्री. दीक्षित यांनी सांगितले.निष्ठावंत 
कार्यकर्त्यांना मिळणार न्याय असे निरीक्षक शरद आहेर, प्रमोद सिसोदे, डॉ. दरबारसिग गिरासे, प्रवीण चौरे यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले . काँग्रेसची विचारधारा घराघरांत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक असून सामान्य कार्यकर्त्याला या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ज्या कार्यकत्यांनी पक्षासाठी संघर्ष केला त्यांना या निवडींमध्ये प्राधान्य देऊन न्याय दिला जाईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. या अभियानामुळे जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळून आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक फळी निर्माण होईल, असा दावा या वेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, सुत्रसंचलन परिक्षित देशमुख यांनी केले.

Post a Comment

0 Comments