Header Ads Widget

*शिंदखेडा येथे शिवसेना उबाठा गटाची नियोजन आढावा बैठक संपन्न* *स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्ष साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रमाची रेलचेल*

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा येथील शिवसेना उबाठा गटाच्या पक्ष कार्यालयात नुकतीच तालुक्यातील पदाधिकारी ची स्व. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्ष जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभरात शिंदखेडा तालुक्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत वर्षभरात तालुक्यातील विविध ठिकाणी विविध गावांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्याविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वर्षभरासाठी नियोजन करण्यात आले . सदर वर्षभरामध्ये शालेय व महाविद्यालय वकृत्व स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, मैदानी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ शिवसैनिकांचे मेळावा व सत्कार,गोरगरिबांसाठी कपडे साहित्य वाटप,भजन स्पर्धा, व्याख्यान माला, संघर्ष यात्रा, गाव तेथे शाखा, चित्र प्रदर्शन आदी सह अनेक कार्यक्रमाचे तारखानिहाय नियोजन करण्यात आले. तसेच सध्या SIR विशेष सखोल पुनरिक्षण अतर्गत मतदार यादी शुद्ध, अचुक आणि अदयावत करणे, नाव जोडणे, नाव कमी करणे,१८ वर्ष पुर्ण झालेल्या नवीन मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मृत्यू आणि स्थलांतरीत नावे कमी करणे, नावात दुरुस्ती करणे यासाठी शिवसैनिकांनी बुथनिहाय नियोजन करण्यासाठी बी.एल. ए. नेमणूक, बुथ प्रमुख नेमणूक करून सदर कार्यक्रम यशस्वी करणे हयासाठी शिंदखेडा विधानसभा मतदार संघात उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहरप्रमुख, बुथप्रमुख यांना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिवसेना उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात नियोजन बैठकीत माहिती दिली. हयाप्रसंगी जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख छोटु पाटील, सर्जेराव पाटील, उपजिल्हा समन्वयक मनोज पवार,तालुका प्रमुख गिरीश देसले, शहर प्रमुख संतोष देसले, उपतालुका प्रमुख मनोहर राजपूत, उपसंघटक चंद्रसिग ठाकूर,माजी शहरप्रमुख सागर देसले, उपशहरप्रमुख नंदकिशोर पाटील, मगन लांडगे,एस. टी. कामगार सेनेचे तालुका प्रमुख आर. आर. पाटील,भैय्या कोळी, दरबारसिग राजपूत, आधार बोरसे, राजेंद्र माळी,एस. डी. पाटील, योगेश चौधरी आदिसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments