Header Ads Widget

*विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सिसोदे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष डाॅ.सिद्धार्थ सिसोदे यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करुन केले अभिवादन.*


नरडाणा: 14-04-2026, ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ नरडाणा संचालित कै.भाऊसाहेब एम.डी.सिसोदे कला, वाणिज्य व डॉ.सौ.उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान आणि श्रीमती आर.एम.सिसोदे कनिष्ठ महाविद्यालय येथे महाविद्यालय गुणवत्ता निर्धारण कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

ग्रा.वि.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब संजय मधुकरराव सिसोदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच गावातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ.सिद्धार्थ सिसोदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.पी.एस.गिरासे, उपप्राचार्य डॉ.यू.जी.पाटील, उपप्राचार्य प्रा.एस.टी.भामरे, प्रा.व्ही.बी.खैरनार, प्रा.बी.एम.पाटील, डॉ.पी.जी.सोनवने, प्रा.डॉ.एस.एम.सिसोदे, प्रा.पी.जी.पाटील, प्रा.के.एस.कढरे, श्री.आर.ओ.पाटील, श्री.डी.व्ही.बोरसे, श्री.शंकर सिसोदे, श्री.संजय बोरसे, श्री.शैलेंद्र सिसोदे, श्री.फारुक कुरेशी तसेच मा.मुख्याध्यापक कढरे सर, श्री.भाईदास बैसाणे, श्री.श्रीकांत बैसाने, श्री.राजू महाले, श्री.विशाल मंगळे, नरडाणा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.बेहेरे सर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री.वसिम शेख सर, श्री.कासीम शेख सर, रफात मॅडम, पिंप्राड जिल्ह्य परिषद शाळेचे श्री.सुशील पाटील सर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments