Header Ads Widget

🚨 शेतकऱ्यांचा संताप उसळला! कर्जमाफी, भरपाई व योजनांवर तात्काळ निर्णयाची मागणी


📢 क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा एल्गार; तात्काळ निर्णयाची मागणी

धुळे (प्रतिनिधी): क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बँकांकडून कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी खाजगी सावकारांकडे वळत असून त्यांचे शोषण होत असल्याची गंभीर बाबही मांडण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने काही योजनांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामीण भागात चोरी व घरफोडीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अद्याप न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments