" आल्या आठवणी जुन्या...
हळूच फुंकर घाली म्हणा... "
" सोहळा आनंदाचा...
गोड आठवणींचा... "
46 वर्ष पूर्वी बारावी वाणिज्य वर्गांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिंदखेडा येथील
मनमिरा मंगल कार्यालयात
" स्नेहमिलन "
चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या स्नेहमिलना च्या कार्यक्रमात सात विद्यार्थिनी आणि 33 विद्यार्थी मित्रांनी भाग घेतला होता.
आपआपल्या फॅमिली सह एकूण 70 एकत्रित आले होते.
कार्यक्रम तीन दिवसाचा होता
पहिला दिवस.....
2 ऑक्टोबर या तारखेला पुणे , मुंबई , ठाणे , गोवा , बडोदा , नाशिक इथे राहणाऱ्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे आगमन झाले आगमन झाल्यानंतर महिला वर्गांचे औक्षण करण्यात आले.
तदनंतर सर्वजण फ्रेश होऊन पाटण येथील आशापुरी देवीच्याघेतले देवीचे दर्शन घेतले दर्शन झाल्यानंतर 46 वर्ष पूर्वी ज्या कॉलेजला शिकले त्या कॉलेजला जाऊन भेट दिली.
त्यावेळी बारावीचा वर्ग भरत होता त्या ठिकाणी जाऊ आपल्या आपल्या जागेवर बसून जुन्या आठवणी एक एक करून डोळ्यासमोर येऊ लागल्या...
बारावीच्या वर्गात विद्यार्थी मित्र एकत्रित आल्यावर मित्रांनी सांगितले सतीश पाटील सर तुम्ही आमचा तास घ्या तेव्हा.....
प्रा सतीश पाटील यांनी अंधश्रद्धा किती वाईट असते त्याची विदर्भ येथील भोंदू बाबा विश्राम महाराज यांची सत्य घटना सांगितली... या घटनेत दीड ते दोन महिन्याच्या लहान मुलीला अवधसा ठरवून त्या भोंदू बाबा ने आई-वडिलांच्या हातून तिची हत्या केली ही सत्य घटना सांगितली...
कॉलेजला भेट दिल्यानंतर सर्व मंडळी मनमिरा मंगल कार्यालय पुन्हा एकत्रित जमले.
रात्री जेवण झाल्यावर गप्पांच्या मैफिली रंगू लागल्या.
दुसरा दिवस....
३ ऑक्टोबर ला गुरुजन वर्ग यांचा सत्कार करण्यात आला गुरुजन वर्गामध्ये प्रा ए बी कुलकर्णी ,
प्रा श्रीमती एस बी पवार, प्रा ए एस जोशी ,
प्रा सी जे सोनार ,
यांना सन्मानपत्र देऊन गुरुजनवर्गांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमान किशोर देशमुख (आरटीओ) होते.
या गुरुजनांचा सत्कार झाल्यानंतर गेट-टुगेदर या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मित्रपरिवारला स्मृतिचिन्ह प्रत्येकाचा सत्कार करण्यात आला.
सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर
विद्यार्थ्यांच्या पहिल्या मनोगतात प्रा सतीश पाटील यांनी मित्र सुखदुःखात कशा पद्धतीने कामाला येतात.
मित्र म्हणजे दोस्ती
आणि
दोस्ती म्हणजे जिंदगी
जिंदगी का नाम दोस्ती...
दोस्ती का नाम जिंदगी....
मित्र नसतील तर एकटे मन
मनुष्याला अंधाराच्या खाईतनेते
म्हणून प्रत्येकाच्या जीवनात मित्र असावेच....
कल्पना जैन , सुनिता भुतकर
ॲड प्रमोद दीक्षित , पीएसआय ज्ञानेश्वर पाकळे , प्रकाश बोरसे ,
प्रमोद जोशी , अविनाश शहा, किशोर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले..
हा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री नाशिक येथील -- अतुल निकम आणि जाधव यांनी गाण्यांची मैफिल चांगलीच रंगवली....
यात या गाण्यांच्या मैफिलीत सर्व विद्यार्थी मित्रांनी 46 वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यांचा चांगलाच आस्वाद घेतला
प्रत्येकाने आपल्या आवडीच्या गाण्यांची मनमुराद पणे हौस पूर्ण केली.....
46 वर्षापूर्वी.....
" खाई के पान बनारस वाला "
" सारा जमाना हसीनो का दिवाना
या गाण्यावर मनोहर पाटील यांनी
नृत्य करून जुन्या आठवणी ताज्या करून दिल्यात.
सर्व विद्यार्थ्यां & विद्यार्थीनींनी आपल्या गुडघ्याची दुखणे विसरून मराठी चित्रपट झिंगाट च्या गाण्यावर नृत्य करून आपली हौस पूर्ण केली.
शेवटी सर्व विद्यार्थिनींनी एकत्रितपणे गरबा नृत्य करून आपली नृत्याची हौस पूर्ण केली..
तिसरा दिवस....
चार ऑक्टोबर सकाळी उठून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेऊन समारोपाचा कार्यक्रम आपल्या डोळ्यातील अश्रूंनी घेऊन एकमेकांना निरोप दिला...
विद्यार्थी मित्रांचा परिचय आणि सूत्रसंचालन प्रमोद जोशी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता सोनगडकर ,
मनोहर पाटील , सतीश पाटील , अनिल कासार , नितीन विसपुते प्रमोद जोशी यांनी मेहनत घेतली.
===================================
0 Comments