🔶िशदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
येथील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनाचे औचित्य साधून 'विश्व वृद्ध दिवस' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ शिंदखेडा आणि तालुका विधी सेवा समिती, शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने याप्रसंगी विशेष कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. एन. पी. पाटील हे होते, तर प्रास्ताविक ॲड. हर्षल अहिरराव यांनी केले.
तालुका विधी सेवा समितीचे ॲड. बी. व्ही. सोनवणे यांनी स्पष्ट केले की, “जर मुलगा आई-वडिलांना सांभाळत नसेल किंवा खाऊ घालत नसेल, तर खावटीसाठी थेट प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ प्रमाणे खावटी मागण्याचा अधिकार आहे.”
ॲड. निलेश देसले यांनी वृद्धांसाठीच्या एकात्मिक कार्यक्रमांची माहिती देताना वृद्धाश्रम डे, केअर युनिट, मोबाईल वैद्यकीय व्हॅन आदी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शासकीय योजनांवर ९०% पर्यंत सबसिडी उपलब्ध असून ज्येष्ठांनी सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. वृद्धांना केवळ आदराची आणि सन्मानाची अपेक्षा असते, जी मुलांनी दिलीच पाहिजे, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
शिंदखेडा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. बी. झेड. मराठे यांनी सांगितले की,“ज्येष्ठ हे आयुष्यभर संघर्ष करून मुलांचे भविष्य घडवतात.
कार्यक्रमास शिंदखेडा न्यायालयीन कर्मचारी समीर शेख, एन. बी. पवार, योगेश बोरसे, डी. आर. जोशी, आणि ग्रंथपाल सुभाष देसले उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे वाचनाध्यक्ष अशोक राखेचा, खजिनदार गुलाबराव पाटील, सचिव चंद्रकांत डागा, संचालक बी. आर. पाटील यांच्यासह वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव पवार, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. शिरीष सोनवणे, ॲड. ए. एन. शेख, ॲड. पूजा कासार, ॲड. अनिता सोनवणे, ॲड. गीतांजली सोनवणे आणि ॲड. शारदा मराठे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. हर्षल अहिरराव यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड. व्ही. एल. पाटील यांनी केले. या शिबिरामुळे शिंदखेड्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
0 Comments