Header Ads Widget

वन्यजीव वाचवा... झाडे वाचवा... निसर्ग वाचवा!बेटावद येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

“ढोल-ताशांचा गजर अन् वन्यजीव संवर्धनाचा हुंकार! बेटावदच्या विद्यार्थ्यांनी दिला ‘निसर्ग वाचवा’चा संदेश”
बेटावद, ता. शिंदखेडा : सामाजिक वनीकरण विभाग, शिंदखेडा आणि राष्ट्रीय हरित सेना निवड झालेल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बेटावद यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वन्यजीव वाचवा...!’, ‘झाडे वाचवा...!’, ‘निसर्ग वाचवा...!’ अशा घोषणा देत नागरिकांमध्ये वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून, वन्यजीव वाचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. पी. के. पाटील यांनी केले.
या जनजागृती रॅलीत वनरक्षक यमुना पवार, प्रियदर्शिनी विद्यालय तसेच आदर्श शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच संबंधित विभागाचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments