Header Ads Widget

*एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थी नोकरी साठी रवाना*

शिंदखेडा येथील श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे. पाटील ऊर्फ बाबूराव दादा साहित्य,वाणिज्य आणि कै . भाऊसाहेब म.दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा आणि  आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्यात.
या रोजगार मेळाव्याला 350 विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल 156 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली. त्यात बी.कॉम आणि बी. एस्सी. या शाखेतील दहा विद्यार्थ्यांची पहिली टीम पुणे येथील टाटा गोशन  या नामांकित कंपनीत डाटा ऑपरेटर  या पदासाठी निवड झाली असून, त्यांना दरमहा ₹19,000 पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. त्यात महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचीही समावेश आहे. त्यांना दरमहा ₹ 22500 पेक्षा अधिक वेतन मिळणार आहे. या सर्व नोकरी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळचे भोजन, ESI, PF आणि इतर कंपनीच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. शिक्षणातून कौशल्याकडे, कौशल्यातून रोजगाराकडे आणि रोजगारातून आत्मनिर्भरते कडे जाणाऱ्या प्रवासाची एक यशस्वी सुरुवात झाली आहे. शिक्षण घेऊन पदवी प्राप्त एवढ्यापुरती शिंदखेडा महाविद्यालयाची भूमिका मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांना नोकरी व रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठीही महाविद्यालय प्रयत्नशील आहे. 
या संपूर्ण उपक्रमासाठी मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. बापूसाहेब प्रफुलकुमार सिसोदे, उपाध्यक्ष मा. बापूसाहेब अशोक पाटील, संचालक मा. भाऊसाहेब सुरेश देसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील, उपप्राचार्य डॉ.संजय बोरसे, उपप्राचार्य. डॉ. विशाल पवार,  प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा. डॉ.जितेंद्र पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुवर्णसिंह राऊळ, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमचे प्रमुख भूषण वानखेडे, चिवीत जगदेव, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments