Header Ads Widget

*कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाची कुस्ती स्पर्धेत विजयी घोडदौड**पै. हर्षद चौधरीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*


*रांजनोली / ठाणे (प्रतिनिधी) :* क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व विभागीय कुस्ती स्पर्धेत *कै. धोंडू एन. ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, रांजनोली* च्या विद्यार्थ्याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाचा कुस्तीवीर *पै. हर्षद प्रवीण चौधरी (६७ किलो गट)* याने *१९ वर्षाखालील ग्रीको-रोमन* गटात प्रथम क्रमांक पटकावत *सुवर्णपदक* मिळवले आहे. या यशामुळे त्याची *मुंबई विभागातर्फे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड* झाली आहे.

ही विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा *दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी खोपोली* येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन *कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस श्री. निलेश भगत* यांनी केले होते. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक *श्री. अमोल दंडवते* आणि भिवंडी तालुका क्रीडा केंद्रप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या सुवर्ण यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष *श्री. करसन ठाकरे*, प्र. प्राचार्य *सचिन ठाकरे*, प्राचार्य *गोरक्षनाथ तरे*, प्रा. हर्षद शेटे, प्रा. आर. आर. कसबे, आयटी विभाग प्रमुख रजा पटेल, प्रा. रंजिता मॅडम, प्रा. जोगी मॅडम, प्रा. ऐश्वर्या चव्हाण, विशाल सर, सौ. सोनाली पवार, स्वाती भोईर, विनायक ढोबळे यांनी पै. हर्षदचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे ॲडमिन *श्री. रुपेश तरे* यांनी सांगितले की, _"हे यश आमच्या क्रीडा संचालक *डॉ. मनिलाल शिंपी* यांच्या कठोर मेहनत आणि जिद्दीमुळेच मिळाले आहे."_ संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे यांनीही डॉ. शिंपी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

*- श्री. पांडुरंग शिंपी (प्रतिनिधी, दोंडाईचा) / कल्याण*

Post a Comment

0 Comments