Header Ads Widget

*प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या ‘विषमभुज त्रिकोण’ कथासंग्रहाचा शासनमान्य ग्रंथयादीत गौरव*


(श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधि यांचेकडुन) ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मोठी मान्यता
दोंडाईचा येथील शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष व अ.भा.श्री क्षत्रिय आहिर शिंंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे संचालक  व प्रसिद्ध साहित्यिक *प्रा. प्रकाश भांडारकर* लिखित *"विषमभुज त्रिकोण"* या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या *सन २०२४ च्या ‘शासनमान्य मराठी ग्रंथांची यादी’* मध्ये मानाचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यभरातून प्रकाशित झालेल्या सुमारे *१५,००० पुस्तकांपैकी* निवडलेल्या *८०० मान्यताप्राप्त दर्जेदार पुस्तकांच्या यादीत* या कथासंग्रहाने *७५६ व्या क्रमांकावर* स्थान पटकावले आहे. ही बाब साहित्य क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

‘विषमभुज त्रिकोण’ या कथासंग्रहात मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत, विषमता आणि जीवनातील वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. साधी सोपी भाषा, ओघवती शैली आणि जीवनानुभवाचे दर्शन यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या मनात ठसा उमटवतो.

प्रा. भांडारकर सरांनी यापूर्वी *"प्रारब्ध" (आत्मचरित्र)* आणि *"प्रकाशवाट" (काव्यसंग्रह)* अशी दर्जेदार पुस्तके लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

या उल्लेखनीय साहित्यिक यशाबद्दल साहित्य वर्तुळातून तसेच शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून प्रा. प्रकाश भांडारकर सरांचे सर्वत्र *हार्दिक अभिनंदन* होत असून त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत दोंडाईचा शिंपी समाज अध्यक्ष श्री मनोज मेटकर, माजी अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष श्री देवेन्द्र गवळे, सचिव श्री सचिश जाधव, सहसचिव प्रा राजेंद्र कोंटुरवार, सल्लागार प्रा डाॅ कैलास कापडणे, श्री मधुकर जाधव, श्री संजिव संधानशिवे, श्री दिलीप सोनवणे, श्री गोपाल कापुरे श्री सचिश सोनवणे व अनेक मान्यवरानी प्रा.प्रकाश भांडारकर सर यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments