शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्याती वाडी गावात आठवडे बाजाराचा दुसरा आठवड्याच्या खरेदीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने, आज दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.खेळणी ,कटलरी, भाजीपालाचे सहा दुकाने ,चप्पल वाला, बेकरीवाला. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते
11ऑगस्ट2024 रोजी वाडी गावात झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने विक्रेत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला . व त्यांनी मला आश्वासित केलं की पुढेही आम्ही नियमित या ठिकाणी दुकाने लावू. याप्रसंगी वाडी गावातील नागरिकांचे अभिनंदन करेल, की त्यांनी बाहेरगावाहून वस्तू खरेदी करण्यापेक्षा गावातील दुकानांमध्ये खरेदी करण्यावर भर दिलेला आहे. आज मनस्वी आनंद झाला की ,माता भगिनींचे अनेक छोट्या मोठ्या गरजांची सोय गावातच होताना दिसते आहे. गावात ड्रॅगन फ्रुट हे फळ पिकवणारा शेतकरी सुनील धोंडू गिरासे या शेतकऱ्याने देखील बाजारात दुकान लावले हे स्वावलंबनाकडे एक पाऊल आहे.असे वाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिग गिरासे यांनी सांगितले.
0 Comments