शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील शेंदवाडे गावात वीर एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळाची शाखा फलकाचे शुभ अनावरण रवींद्र जाधव साहेब एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आदिवासी भिल्ल समाजातील उद्योजक व वीर एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाचे नेते देविदास मोरे शेवाडे आणि संघटनेचे प्रवक्ते प्रतोद सदाशिव दादा मिस्त्री शेदवाडे गावाचे हेमंत सुर्यवंशी पोलिस पाटील तावखेडा गावाचे उपसरपंच श्री विष्णू ईशी ,ग्रामपंचायत सदस्य शेंदवाडे शिवदास गुलबा साळुंखे व शिवदास वनसिंग मालचे ग्रामपंचायत सदस्य शेदवाडे, संघटनेचे तरुणाचे नेतृत्व करणारे मुस्ताक दादा शेख व तावखेडा गावाचे शाखा अध्यक्ष दीपक ठाकरे संघटनेचे सदस्य व शेंदवाडे गावातील सर्व कमिटीचे अध्यक्ष अभिमन भगवान मालचे,उपाध्यक्ष रघुनाथ मारू मालचे, सचिव धनराज शिवदास मालचे, उपसचिव वसंत मोहन मालचे,खजिनदार सोपान प्रकाश मालचे, उपखजिनदार राजू सोमा मालचे,सल्लागार रामसिंग दास सोनवणे, उपसल्लागार सुदाम भाईदास मालचे, सदस्य राहुल धनसिंग मालचे, पावभा हिरामण मालचे,भारत देवबा मालचे,चंद्रसिंग देवीदास मालचे,दिनेश सत्तर मालचे आदी पदाधिकारी व समाजातील ग्रामस्थ व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आदिवासी गौरव दिनानिमित्त गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी आदिवासी समाजाला मोलाचं मार्गदर्शन केले व अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले. शेंदवाडे गाव हे तावखेडा गावात ग्रुप ग्रामपंचायत असून उपसरपंच यांनी मान्यवरांचे ग्रुप ग्रामपंचायत तावखेडा,शेंदवाडे, चावळदे यांच्यामार्फत आभार मानले.
0 Comments