शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका त्वरित जाहीर करावा यासाठी तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार विजय गोस्वामी व शारदा बागले यांना निवेदन उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते सह शेतकऱ्यांनी दिले.
निवेदनातुन म्हटले आहे कि. आपल्या शिंदखेडा तालुक्यात ह्या वर्षी खुप कमी प्रमाणात म्हणजे तुरळक पाऊस झाला असल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकांची वाढ झाली नाही तर काही पिक करपुन जळाले असल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेदिवस वाढतांना दिसुन यायला लागली आहे म्हणून शिंदखेडा तालुक्याला दुष्काळी तालुका जाहिर करावा तसेच शिंदखेडा तालुक्यात खुप कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने हा तालुका सतत दुष्काळी म्हणून जाहीर होत असतो म्हणून शासनाच्या पोखरा योजनेत शिंदखेडा तालुक्याला पोखरा योजनेत समावीष्ट करून घ्यावे.
तसेच मेथी येथील 522/1/2/3 शिवारा गेल्या 8 (आठ) दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्या कडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करत असुन शासकीय अधिकारी व कर्मचारी उपोषण स्थळी येऊन असमाधान कारक उडवाउडवीची उत्तरे देऊन जात आहेत व आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे तर काही उपोषण कर्त्यांची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या मागण्याची व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या खालील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन पुर्तता करावी अन्यथाशिवसेना उबाठा गटाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपण स्वतः व समंधीत अधिकारी व कर्मचारी रहातील कळावे.
मागण्या :-१. शिदखेडा तालुक्यात तुरळक प्रमाणात पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताती पिक कोमेजुन नासदुत होत असल्यामुळे शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर करावा २. शिंदखेडा तालुका व मतदार संघाचा समावेश पोकरा योजनेत समाविष्ठ करण्यात यावा. ३. मेथी शिवारातील गट क्रमांक 522/1/2/3 येथे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन पुर्तता करावी. ४. ज्वारी खरेदीसाठी नोंदवलेल्या सर्व शेतकऱ्यांची ज्वारी प्राधान्याने खरेदी करावी
यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे,जेष्ठ नेते सर्जेराव पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, सागर देसले, दोडायचा तालुका प्रमुख ईश्वर पाटील, नंदकिशोर पाटील, रमेश बोरसे, प्रमानंद पाटील, शिवाजी पाटील, नामदेव भिल, मुकेश ईशी, राजेंद्र अहिरे, नामदेव ठाकरे, मुकेश ईशी, भिकन कोळी, नथा पाटील, देविदास ठाकूर, संजय चौधरी, महेंद्र गिरासे, अनिल भोई, प्रवीण ईशी आदी सह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
0 Comments