जुनी गाडी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
आठ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच ग्रीन टॅक्स (Green Tax) आकारला जाण्याची शक्यता आहे.
नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर लावण्याचा विचार करीत आहे.
ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव आता सल्लामसलतीसाठी राज्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
वाहनयोग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना आकारणार ग्रीन टॅक्स (Green Tax):- या प्रस्तावानुसार जी वाहने आठ वर्षांपेक्षा जुनी आहेत त्यांच्याकडून वाहनयोग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना रस्ता कराच्या १० ते २५ टक्के दराने हरित कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे.
खासगी वाहनांकडून नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना १५ वर्षांनंतर हरित कर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवेतील (शहर बसगाडय़ा) गाडय़ांकडून सर्वात कमी हरित कर आकारण्यात येणार आहे.
⭕कोणत्या वाहनांना मिळणार सूट ?
हायब्रिड, इलेक्ट्रिक आणि सीएनजी, इथेनॉल आणि एल.पी.जी.वर चालणाऱ्या वाहनांना या करातून सूट देण्यात येणार असून हरित कराद्वारे जमा होणाऱ्या महसुलाचा वापर प्रदूषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी केला जाणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले.
१५ वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०२२ पासून रद्द : याशिवाय पर्यावरण संरक्षणासंदर्भात मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
0 Comments