धुळे: ग्रामीण विकास समोर ठेवून सुरू झालेल्या केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Governments) अनेक योजनांचा निधी संसर्गजन्य कोरोनावरील (corona) उपाययोजनांसाठी वळता केल्याने या ग्रामीण योजनांच्या उद्दिष्टालाच धक्का बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाचशेच्या वर ग्रामपंचायतींची (Gram Panchayats) आर्थिक कोंडी झाली आहे.
Also Read: पावसाच्या हुलकावणीने तिबार पेरणीचे संकट
केंद्र सरकारकडून मिळणारा चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असो किंवा जिल्हा विकास योजनेचा निधी, यातून दोन वर्षांपासून कोरोनाच्या उपाययोजनांवर म्हणजे विकासेत्तर कामांसाठी निधी वळता केला जात आहे.
निधी वळती करण्याची सूचना
ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार तो खर्च करावा लागतो. धुळे जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींच्या अखत्यारित ६८१ मोठी गावे आहेत. दोन वर्षांपासून आराखड्याबाहेर जाऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींना हा निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यास सांगितले. जिल्हा विकास निधीतूनही ३० टक्के रक्कम वळती केली जात आहे. आमदारांच्या विकासनिधीत दोन वर्षांत दुप्पट वाढ केली असली तरी त्यांनाही ५० लाख रुपये कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्याचे बंधन घातले आहे. कोरोनावरील नियंत्रण महत्त्वाचे असले तरी ग्रामविकासही तितकाच आवश्यक आहे. दोन वर्षांपासून शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या विविध योजनांचा निधी कोरोना उपाययोजनेच्या नावाखाली वळता केला जात आहे. वित्त आयोगाचा निधी तर केंद्राचा असला तरी तो घेतला जात आहे. या निधीतून यंदा विजेची देयके भरण्यास सांगितले आहे. मग विकास करायचा कसा, असा प्रश्न ग्रामपंचायतींपुढे आहे
ग्रामपंचायतनिहाय गावांची संख्या
तालुका ........ ग्रामपंचायत ......... गावे
धुळे ............ १४१ ........... १६८
साक्री ........... १६९ ........... २२५
शिरपूर .......... ११८ .......... १४७
शिंदखेडा ........ १२४ .......... १४१
एकूण ............ ५५२ .......... ६८१

0 Comments